"ड्वाइट डी. आयझेनहॉवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
|}}
 
'''ड्वाइट डेव्हिड आयझेनहॉवर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Dwight David Eisenhower'') ([[१४ ऑक्टोबर १४]], [[इ.स. १८९०]]; डेनिसन, [[टेक्सास]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[मार्च २८]], [[इ.स. १९६९]]; [[वॉशिंग्टन डी.सी.]], अमेरिका) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ३४वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात याने अध्यक्षपदाची धुरा वाहिली. [[दुसरे जागतिक महायुद्ध|दुसर्‍या जागतिक महायुद्धात]] [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांच्या]] [[युरोप|युरोपातील]] सैन्यांचा सरसेनापती म्हणून याने काम केले. दोस्त सैन्यांच्या ''ऑपरेशन टॉर्च'' या इ.स. १९४२-४३ सालांतील [[उत्तर आफ्रिका|उत्तर आफ्रिकेतील]] युद्धमोहिमेचे आणि पश्चिम आघाडीवरून [[फ्रान्स]] व [[जर्मनी]] यांवरील इ.स. १९४४-४५च्या यशस्वी आक्रमणाचे नियोजन व नेतृत्व त्याने केले. इ.स. १९५१ साली तो नाटो सैन्याचा सरसेनापती म्हणून नेमला गेला. इ.स. १९५३ सालापर्यंत त्याने ते सरसेनापतित्व सांभाळले.
 
आयझेनहॉवर याने [[साम्यवाद|साम्यवादी]] प्रसाराविरूद्ध [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेकडच्या]] देशांना आणि विशेषत: [[लेबेनॉन]]ला केलेली सैनिकी आणि आर्थिक मदत ''आयझेनहॉवर डॉक्ट्रिन'' या नावाने ओळखली जाते. त्याने कोरियात शांतता प्रस्थापित करणे, रशिया व इतर राष्ट्रांशी निःशस्त्रीकरणाच्या वाटाघाटी करणे, सिअ‍ॅटो करार यांसारख्या कामांतून [[जागतिक शांतता]] प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच त्यांनी अमेरिकेतही कर कमी करणे, [[कॄष्णवर्णीय|कृष्णवर्णीयांच्या]] समस्या सोडवणे व बेकारी कमी करणे आदींसाठी प्रयत्न केले.