"शिवाजीराव अनंतराव भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{हा लेख|प्राचार्य शिवाजीराव भोसले|छत्रपती शिवाजीराजे भोसले}}
'''शिवाजीराव अनंतराव भोसले''' ([[१५ जुलै १५]], [[इ.स. १९२७|१९२७]] - [[जून २९]], [[इ.स. २०१०|२०१०]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] वक्ते, लेखक होते.
 
== जीवन ==
भोसल्यांचा जन्म साताऱ्यातील कलेढोण येथे [[१५ जुलै १५]], [[इ.स. १९२७|१९२७]] रोजी झाला. त्यांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव अनसूयाबाई होते. भोसल्यांचे थोरले भाऊ लष्करी अधिकारी, तर दुसर्‍या क्रमांकावरील थोरले बंधू प्राथमिक शिक्षक आणि त्यानंतरचे बंधू बॅ. [[बाबासाहेब भोसले]] हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] माजी मुख्यमंत्री होते. विटा या लहान गावात प्राचार्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सातारा हायस्कूल, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, वाडिया कॉलेज आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांचे माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण झाले. राजश्री शाहू महाराजांच्या बोर्डिंगाच्या 'कमवा शिका' योजनेचा लाभही त्यांनी घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजातून घेतली. भाऊ बाबासाहेब यांच्याबरोबर साताऱ्यात त्यांनी काही काळ वकिलीही केली.
 
फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज, सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे २५ वषेर् प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.