"ख्वाजा नझीमुद्दीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Khawaja Nazimuddin of Pakistan.JPG|thumb|right|200px|ख्वाजा नझीमुद्दीन]]
''हाजी सर'' '''ख्वाजा नझीमुद्दीन''' (देवनागरी लेखनभेद: '''ख्वाजा नझिमुद्दीन'''; [[बंगाली भाषा|बंगाली]]: খাজা নাজিমুদ্দীন ; [[उर्दू भाषा|उर्दू]]: خواجہ ناظم الدین ; [[रोमन लिपी]]: ''Khawaja Nazimuddin'';) ([[जुलै १९]], [[इ.स. १८९४]] - [[ऑक्टोबर २२]], [[इ.स. १९६४]]) हा [[बंगाली]] राजकारणी व [[पाकिस्तान|पाकिस्तानाचा]] दुसरा गव्हर्नर-जनरल, तसेच दुसरा पंतप्रधान होता. पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर-जनरल [[मुहम्मद अली जीना]] यांच्या मॄत्यूनंतर तो [[१४ सप्टेंबर]], [[इ.स. १९४८]] ते [[ऑक्टोबर १७]], [[इ.स. १९५१]] या कालखंडात दुसरा गव्हर्नर-जनरल म्हणून अधिकारारूढ होता. पाकिस्तानाचा पहिला पंतप्रधान [[लियाकत अली खान]] याच्या हत्येनंतर १७ ऑक्टोबर, इ.स. १९५१ रोजी पाकिस्तानाचा दुसरा पंतप्रधान बनला. पाकिस्तानात त्या काळी उतभवलेल्या बंगाली-पंजाबी भाषक संघर्षाच्या व अहमदिया-उर्वरित मुस्लिमांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर [[१७ एप्रिल १७]], [[इ.स. १९५३]] रोजी तत्कालीन गव्हर्नर-जनरल [[गुलाम मुहम्मद]] याने नझीमुद्दिनास पंतप्रधानपदावरून हटवले.
 
== बाह्य दुवे ==