"१४ वे दलाई लामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
त्यांचे आई-वडील [[शेतकरी]] होते. त्यांच्याकडे असलेल्या [[शेती]] व [[गाय|गाई]], [[म्हैस|म्हशींवर]] ते आपला उदरनिर्वाह चालवायचे. हे कुटुंब [[इ.स. १९३९]] मध्ये दलाई लामांच्या चौथ्या वाढदिवसानंतर आपलं छोटसं खेडेगाव सोडून [[ल्हासा]] येथे आले.
 
दलाई लामांच्या निवडीसाठी असलेल्या विविध कसोट्या यशस्वीरीत्या पार केल्यावर [[२२ फेब्रुवारी २२]], [[इ.स. १९४०]] रोजी [[पो ताला प्रासाद|पो ताला प्रासादात]] एका विधिपूर्व समारंभात ''तेंझिन गियात्सो'' विद्यमान चौदावे दलाई लामा म्हणून आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. पुढे त्यांचा धर्मविषयक सखोल अभ्यास सुरु असताना [[इ.स १९५०]] मध्ये [[चीन]]ने [[तिबेट]]वर आक्रमण केले. आणि हा प्रदेश चीनचा भाग असल्याचे घोषित केले. त्याचवेळी तिबेटच्या राजकीय सत्तेची सर्व सूत्रे दलाई लामांच्या हातात आली. या काळात तिबेटवर चिनी राजवटीचा अनियंत्रित अंमल सुरु झाला . धाक, दडपशाही, जुलूम, जबरदस्ती, छळवणूक, पिळवणूक इत्यादी अत्याचार तिबेट चरील जनतेवर चीनी राज्यकर्ते व लष्कराकडून होत होते. भगवान [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धाच्या]] शांतताप्रिय देशात हिंसाचार, लाठीमार अश्रुधूर व गोळीबार या अत्याचारांनी परिसीमा गाठली. जनतेच्या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्यावर र्निबध लादले गेले. तिबेटीय कला, संस्कृती व परंपरा यांचा ऱ्हास केला गेला. चीनच्या वाढत्या जाचामुळे व अत्याचारामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दलाई लामांना त्याच्या कुटुंबियांसह [[इ.स. १९५९]] मध्ये [[तिबेट]] सोडावे लागले. ते भारतात शरण आले. काही लोक [[नेपाळ]], [[भूतान]] व इतरत्र शरण गेले. [[जवाहरलाल नेहरू]] आणि लामा यांची [[इ.स. १९५९]] मध्ये [[मसूरी]] येथे भेट झाली. आज जगभरातील विविध देशांमध्ये तिबेटीय माणसे निर्वासितांचं आयुष्य कंठत आहे. त्यातील बहुतांश मात्र भारतात आहेत. [[हिमाचल प्रदेश|हिमाचल प्रदेशातील]] [[धरमशाला]]त दलाई लामा वास्तव्यास आहेत. येथे त्यांनी लोकशाही मूल्यांच्या तत्वावर तिबेटीय निर्वासितांची संसद स्थापन केली आहे. आज ही संसद किंवा निर्वासितांचे सरकार दलाई लामांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.
 
==लढा==