"रॉनल्ड रेगन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
| सही = Ronald Reagan Signature2.svg
|}}
'''रॉनल्ड विल्सन रेगन''' (मराठी लेखनभेद: '''रोनाल्ड विल्सन रेगन''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Ronald Wilson Reagan'') ([[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९११]] - [[जून]], [[इ.स. २००४]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४०वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९८१ ते २० जानेवारी, इ.स. १९८९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षपदाअगोदर हा [[कॅलिफोर्निया]]चा ३३वा गव्हर्नर (इ.स. १९६७ - इ.स. १९७५) होता. राजकारणात प्रवेशण्याआधी रेगन रेडिओ, [[चित्रपट]] व [[दूरचित्रवाणी]] माध्यमांतील अभिनेता होता.
 
रेगन शिक्षणाने [[अर्थशास्त्र]] व [[समाजशास्त्र]] विषयांचा पदवीधर होता. पदवी मिळवल्यानंतर तो प्रथम [[आयोवा]] येथे रेडिओवर रुजू झाला. इ.स. १९३७मध्ये तो [[कॅलिफोर्निया]]त [[लॉस एंजेल्स]] येथे हलला. तेथे त्याने अभिनयास सुरुवात केली. अनेक चित्रपटांमधून व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून साकारलेल्या भूमिकांमुळे त्याला लोकप्रियता लाभली. इ.स. १९६२ साली तो [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षात]] प्रवेशला. इ.स. १९६४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकींत बॅरी गोल्डवॉटर याच्या समर्थनार्थ त्याने केलेले प्रेरणादायक भाषण ऐकून रिपब्लिकन पक्षाने त्याला कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदासाठी उभे केले. तो दोनदा या पदावर निवडून आला. तो इ.स. १९६८ व इ.स. १९७६ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीचे नामांकन मिळवण्यात अपयशी ठरला, तरीही इ.स. १९८० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत पक्षाकडून उमेदवारीचे नामांकन मिळवण्यात तो यशस्वी झाला. अध्यक्षीय निवडणुकींत त्याने त्या वेळचा विद्यमान अध्यक्ष व [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅट]] उमेदवार [[जिमी कार्टर]] याला हरवून निवडणूक जिंकली.