"बाबूराव गोविंदराव शिर्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५५:
 
== जीवन ==
महाराष्ट्रातील [[सातारा]] जिल्ह्यातील [[पसरणी]] या छोट्याश्या गावात शिर्क्यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी ''कमवा व शिका'' हे तत्त्व आचरत शिक्षण पूर्ण केले. [[जून]], [[इ.स. १९४३]] रोजी त्यांनी ''[[स्थापत्य अभियांत्रिकी|स्थापत्य अभियांत्रिकीची]]'' पदवी मिळवली. [[वाई]]-पसरणी परिसरात व शिक्षणाची परंपरा नसणार्‍या स्वतःच्या घराण्यात शिकून अभियंता झालेले ते पहिलेच होते.
 
शिक्षणानंतर नोकरीत अख्खी कारकीर्द घालवण्याऐवजी करण्याऐवजी स्वत:ची कंपनी उभारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. सुरुवातीला छोट्या-मोठ्या कंपन्यांत नोकरी करत उद्योगाला आवश्यक असा अनुभव त्यांनी मिळविला. [[सप्टेंबर ९]], [[इ.स. १९४४]] रोजी दसर्‍याच्या मुहूर्तावर त्यांनी ''सुप्रीम कन्स्ट्रक्शन'' नावाची कंपनी सुरू केली. कंपनी सुरू केल्यानंतर इ.स. १९४४ च्या सुमारास सैन्याकडून कामे मिळविण्यासाठी ते एका सैनिकी अधिकार्‍याला त्याच्या घरी भेटले होते. सुदैवाने त्या अधिकार्‍यानेही शिर्क्यांची कष्टाची तयारी पाहून त्यांना बांधकामांची कंत्राटे मिळवून दिली. पुढे [[इ.स. १९४५]] साली कोल्हापूर कारागृहाच्या बांधकामाचे मोठे कंत्राट त्यांना मिळाले.