"रिचर्ड लॉरेन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
graphic
छोNo edit summary
ओळ २:
'''रिचर्ड लॉरेन्स''' ([[इ.स. १८००]]?:[[इंग्लंड]] - [[जून १३]], [[इ.स. १८६१]]:[[वॉशिंग्टन डी.सी.]]) हा अमेरिकन अध्यक्षाचा खून करण्याचा प्रयत्न करणारा पहिला माणूस होता.
 
लॉरेन्स हा मनोरूग्ण होता. तो रंगारी होता व रंगातील रसायनांनी त्याचा आजार बळावल्याची शक्यता आहे. त्याचा असा समज होता की तो [[इंग्लंड]]चा राजा [[रिचर्ड तिसरा]] होता व अमेरिकन सरकारकडून त्याला खूप पैसे येणे होते. त्याच्या समजानुसार अमेरिकन अध्यक्ष [[अँड्रुअँड्र्यू जॅक्सन]] हे पैसे त्याला मिळु देत नव्हता.
 
याचा 'बदला' घेण्यासाठी लॉरेन्सने दोन पिस्तुले खरेदी केली व जॅक्सनवर पाळत ठेवु लागला. [[जानेवारी ३०]], [[इ.स. १८३५]] रोजी जॅक्सन [[दक्षिण कॅरोलिना]]च्या प्रतिनिधी [[वॉरेन आर. डेव्हिस]]च्या अंत्ययात्रेसाठी गेला. लॉरेन्सने एका खांबामागुन जॅक्सनवर नजर ठेवली व जसा तो जवळ आला, त्यासरशी लॉरेन्सने पुढे होउन जॅक्सनवर मागुन पिस्तुल रोखले व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी झाडली गेलीच नाही. ते पाहता लॉरेन्सने दुसरे पिस्तुल झाडले परंतु त्याचीही तीच गत झाली. तोपर्यंत जॅक्सन व ईतरांनी लॉरेन्सला पाहिले व झटापट सुरू झाली. जॅक्सनने हातातील काठीने लॉरेन्सला टोले लगावले व ईतरांनी त्याला पकडले.