"चित्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४१:
 
चित्ता साधारणपणे दिवसा शिकार साधतो. सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उन्हे कलल्यानंतर तो शिकार साधतो. दुपारच्या उन्हात तापमानामुळे तो शिकार करणे टाळतो. दुरुन शिकार टेहाळल्यावर भक्ष्याच्या जास्ती जास्त जवळ दबा धरून जातो व साधाराणपणे १० ते २० मीटर मध्ये भक्ष्य आल्यावर तो जोरदार वेगवान चाल करतो. चित्याची ही चाल पाहणे अतिशय नेत्रसुखद अनुभव असतो. अनेक छायाचित्रकार चित्याचा हा ण टिपण्यास आतुर असतात. चित्ता कधी लांबवर खूप काळ पाठलाग करत नाही. चित्याला वेग असला तरी लांबवर पाठलाग करण्याचे बळ त्याच्या पाशी नसते. साधारण पणे १ ते दीड मिनिटापर्यंत पाठलाग करून शिकार साधतो. नाही जमल्यास तात्पुरता शिकारीचा नाद सोडून देतो. चित्ता पाठलाग करताना चित्ता आपल्या शिकारीला सरळसरळ गळा पकडूक ठार मारत नाहीत. पाठलागा दरम्यान पहिले शिकारीला पाडायचा डाव असतो व त्यानंतर त्याचा वेग कमी होतो व मग जखमी करून मग शिकारीला मारण्यात येते. शिकार साधल्यानंतर चित्ता बराच वेळ दम खातो. त्याचे शरीराचे तापमान पाठलागा दरम्यान प्रचंड वाढते व ते कमी करण्यात बराच वेळ जातो.
 
== चित्त्याच्या पुनर्वसनाचा प्रयत्न ==
हैदराबाद येथील काही भारतीय शास्त्रज्ञांनी इराण मधील आशियाई चित्त्यांचे क्लोनिंग करण्याचा प्रस्ताव मांडला होता.परंतु आशियाइ चित्त्याची स्थिती [[अतिशय चिंताजनक प्रजाती|अतिशय चिंताजनक]] आहे, व त्यांची संख्या १०० देखील उरलेली नाही.त्यामुळे आफ्रिकेतील चित्त्यांना आयात करण्यावर विचार चालू आहे.
 
== ऐतिहासिक संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चित्ता" पासून हुडकले