"कोसल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''{{लेखनाव}}''' हे प्राचीन भारतातील सोळा [[भारतीय इतिहास#महाजनप...
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र:mahajanapade.svg|right|thumb|300px|प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे]]
'''{{लेखनाव}}''' हे प्राचीन [[भारत|भारतातील]] सोळा [[भारतीय इतिहास#महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक होते.
==प्रदेश==
{{काम चालू}}
 
[[हिमालय|हिमालयाच्या]] पायथ्याशी आधुनिक [[नेपाळ]] व [[उत्तर प्रदेश]]च्या परिसरात कोसलचे राज्य होते. हे बलाढ्य व मोठे राज्य होते त्यामुळे त्याचे दोन विभाग करुन [[शरयू नदी]] सीमा ठरविली होती. शरयूच्या उत्तरेस उत्तर कोसलचे राज्य असून [[श्रावस्ती]] ही त्याची राजधानी होती. या नदीच्या दक्षिणेकडे दक्षिण कोसलचे राज्य होते आणि [[कुशावती नगरी]] त्याची राजधानी होती. या राज्याच्या प्रभावाखाली शाक्य व कोलीय ही राज्ये होती.
 
==राजे व राज्यकर्ते==
 
प्रारंभी कंस या पराक्रमी राजाने [[काशी (महाजनपद)|काशी]]चे राज्य जिंकून घेतले. [[गौतम बुद्ध|बुद्धाच्या]] समकालीन प्रसेनजित हा सम्राट कोसलच्या सिंहासनावर आरूढ झालेला होता. याने आपल्या राज्याचा बराच मोठा विस्तार केलेला होता. शाक्य गणराज्याची मुलगी प्रसेनजितची पत्नी होती. प्रसेनजितचचा पुत्र विद्दुभ याने शाक्य राज्यावर आक्रमण केले होते.
 
==संकिर्ण==
 
कोसल राज्यात शेती व व्यापाराची भरभराट झालेली होती. [[अयोध्या]], साकेत व श्रावस्ती ही मोठी व्यापारी ठिकाणे कोसल राज्यात होती. नंतर हे राज्य [[मगध|मगधात]] विलिन झाले. बौद्ध काळातील बलाढ्य राज्यात कोसलाचा समावेश होतो.
 
 
[[वर्ग:महाजनपदे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोसल" पासून हुडकले