Content deleted Content added
No edit summary
ओळ २४:
:व्याकरण संबंधीचे बदल स्वयंचलित संगकाम्यांद्वारे करणे तितकेसे सोपे नाही. उदा: [http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%B2&curid=16044&diff=860555&oldid=761464 आपला बदल]
:या मध्ये प्रती मधला '''ती''' दीर्घ आहे (जो वर दिलेल्या लेखात बरोबर होता), परंतु, प्रति, माननीय संपादक... या मधला '''ति''' ऱ्हस्व आहे. अश्या बाबतीत सर्व प्रति ला प्रती मध्ये बदलणे किंवा प्रती ला प्रति मध्ये बदलणे चुकीचे ठरेल. - [[सदस्य:Prabodh1987|प्रबोध]] ([[सदस्य चर्चा:Prabodh1987|चर्चा]]) १३:१९, ७ डिसेंबर २०११ (UTC)
 
::नमस्कार ! आज आपण [[श्री गुरुगीता]] या लेखात केलेले बदल पाहिले. त्यात "भक्तिपूर्वक" हे बदलून "भक्तीपूर्वक" असे बदलले होते; जे चूक आहे. मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार संस्कृतजन्य सामासिक शब्दांत पूर्वपदातील र्‍हस्वान्त शब्द (येथे "भक्ति" हा मूळ संस्कृतातून आलेला शब्द) र्‍हस्वान्तच ठेवला जातो. तो दीर्घान्त करू नये. त्याच नियमाने "गुरुपद" हा सामासिक शब्द योग्य आहे; त्याचे "गुरूपद" करू नये.
::तसेच, "करित" हा बदल चुकीचा आहे. "करीत" (हा करणे या क्रियापदाच्या "करत" या रूपाचा पर्याय आहे) हे लेखन बरोबर आहे; त्याचे "करित" करू नये. "वाचीत (बसणे)", "बोलीत (सुटणे)" इत्यादी उदाहरणे पाहिल्यास, मी काय म्हणतोय त्याची आपल्याला कल्पना येईल.
::--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १३:४४, ७ डिसेंबर २०११ (UTC)