"ऑपरेशन ब्लू स्टार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}'''ऑपरेशन ब्लू स्टार''' ( ਬਿਲਯੂ ਸਟਾਰ ) हे ३ ते ६ जून १९८४ दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्ण मंदीरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे. <ref>[http://www.rediff.com/news/2004/jun/03spec.htm Operation BlueStar, 20 Years On]</ref> अमृतसरमधील सुवर्णमंदीरात शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदीर दहशतवाद्यांचे प्रमुख तळ बनले होते. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांनी यातुन कारवाया चालवल्या होत्या. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना या चकमकीत ठार करुन त्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यात आला.<ref>[http://www.bharat-rakshak.com/LAND-FORCES/Army/History/1970s/Bluestar.html Operation Bluestar, [[5 June]] [[1984]]]</ref> तत्कालिन पंजाबमधील राजकीय घडामोडी, त्यातुन फुटीरतावाद्यांना वाढत जाणारा पाठिंबा, खलिस्तानची मागणी व या सर्वांना मिळणारा शीख धार्मिक पाठिंबा यासर्वांचे पर्या‍वसान पंजाबमधील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हिंसाचारात झाले व परिस्थिती बिघडण्यात कारणीभुतकारणीभूत ठरले. अखेरीस ऑपरेशन ब्लू स्टार चा निर्णय तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले. जर्नेल सिंह भिंद्रनवाले सह बरेच दहशतवादी यात मारले गेले, इतरांनी शरणागती पत्करली. पण सुवर्णमंदीरात त्यावेळी बरेच नागरिकही उपस्थित होते. त्यांचाही यात मृत्यु झाला. याचमुळे शिखांचे सर्वोच्य धार्मिक स्थळ सुवर्णमंदीरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली. हिंसाचाराची मालिका येथेच न संपता याचीच परिणिती पुढे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडुन झालेली हत्या व त्यानंतर उसळलेल्या शीख विरोधी दंग्यांत झाले.
 
==पंजाबातील घडामोडी==
ओळ १०:
*२३ एप्रिल १९८३ ला मध्ये पंजाब पोलिसचे डीआईजी अवतार सिंह अटवाल यांची सुवर्ण मंदिरच्या परिसरात दर्शानासाठी गेले असतांना सुवर्ण मंदिरच्या समोरच गोळी मारुन हत्या झाली. यावेळी तेथे साधारण १०० पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तरीही अटवाल यांचे शव तेथेच २ तास पडुन होते.
*जुन ते ऑगस्ट दरम्यान अकाली दलातर्फे मोठ्या प्रमा़णात रेल रोको व बंद करण्यात आले.
*५ ऑक्टोंबरला रात्री एका बस मधुन उतरवुन ६ हिंदु प्रवाशांना गोळी घालुन मारण्यात आले. अखेर ऑक्टोंबर १९८३ साली कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरुनकारणावरून पंजाबमधील कांग्रेसशासित राज्यसरकारच्या बरखास्तीची केंद्र सरकारने घोषणा करुन राज्यात राष्ट्रपती शासन लागू केले.
*डिसेंबर १९८३ मध्ये जर्नेल सिंह यांनी सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त साहिब मध्ये आश्रय घेतला.
*फेब्रुवारी १९८४ ला प्रीतलारी मासिकाचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार सुमित सिंह शाम्मी यांची हत्या करण्यात आली.
ओळ २२:
ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालिन मेजर जनरल कुलदीप सिंह बरार यांनी केले. सुवर्ण मंदिर व आजुबाजुच्या इमारती दहशतवाद्यांचे गढ बनल्या होत्या. जर्नेल सिंह स्वतः सुवर्ण मंदिरात अकाल तख्त या अतिशय महत्वाच्या भागात होते. त्यांचे सशस्त्र समर्थक व दहशतवादी दलांचे नेतृत्व शाबेग सिंह यांच्याकडे होते. (शाबेग सिंह हे पुर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते, १९७१ च्या युध्दात त्यांनी बांगलादेश मुक्तीबाहिनी च्या सभासदांना प्रशिक्षित केले होते. त्यांनी भा‍रतीय सैन्यात अतिविशिष्ठ सेवा पदक व परमविशिष्ठ सेवा पदक मिळाले होते.)
 
आपल्या ऑपरेशन ब्लू स्टार: अ ट्रु स्टोरी या पुस्तकात मेजर जनरल बरार म्हणतात. ३० मे रोजी मेरठ मधुन त्यांना तातडीने चंदिगढ येथे पोहचण्याचा संदेश मिळाला. तेथेच त्यांना संभाव्य कारवाईचे आदेश व नेतृत्व देण्यात आले. पुढे सांगण्यात आले, परिस्थिती फार बिघडली असुन येत्या २/४ दिवसात खलिस्तानची घोषणा होऊ शकते. यानंतर पंजाब पोलिस दल खलिस्तानच्या स्वाधीन होईल. यानंतर दिल्ली व हरियाणातील शीख पंजाब कडे कुचकूच करुन, हिंदुं पंजाबातुन बाहेर येतील. १९४७ प्रमाणे दंगली उसळन्याची शक्यता आहे. याचवेळी पाकिस्तानही सीमा पार करुन समर्थन देऊ शकतो व बांगलादेश निर्मिती सारखा प्रकार भारतातही घडवला जाऊ शकेल.
 
३ जुन पासुनच भारतीय सेनेने सुवर्ण मंदिराच्या परिसरात मोर्चे बांधणी सुरु केली होती. आजुबाजुच्या काही इमारतींचा ताबा घेऊन त्यावर मशिनगन्स बसवल्या गेल्या. त्याचबरोबर ३ जुन पासुन सुवर्ण मंदिरा सभोवतालच्या परिसरात संचारबंदी लागु करण्यात आली. ३ जुन पासुन ५ जुन पर्यंत अधुन मधुन काही फैरी दोन्ही बाजुंकडुन झाडण्यात आल्या. सुवर्ण मंदिरा जवळील इतर इमारतीतील दहशतवाद्यांनी फारसा प्रतिकार न करता समर्पण केले. मुख्य कारवाईस सुरवात सुवर्ण मंदिरात ५ जुनला रात्री १० वाजेच्या सुमारास झाली.
ओळ ३७:
खलिस्तानची चळवळ लगेचच खंडित झाली नाही. सुवर्ण मंदिराच्या कारवाईने शीख समाजात तीव्र रोष निर्माण झाला. भारतीय सैन्यातही काही शीख सैनिकांनी बंड केले, त्याचवर्षी पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडुन हत्या करण्यात आली व त्यानंतर राजधानी दिल्लीत शीख विरोधी दंगे उसळले.
 
६ जुन नंतर भारतीय सैन्यातील काही शीख सैनिकांनी कारवाईच्या निषेधार्थ बंड केले व अमृतसर कडे कुचकूच केले. राजस्थान मधील गंगानगर, बिहार मधील रामगढ, मुंबई जवळील ठाणे, तसेच अलवर, जम्मू आणि पुणे येथे शीख सैनिकांचे बंड झाले होते. रामगढ मधील सैनिकांनी ब्रिगेडियर पुरींची हत्याही केली. पण लवकरच भारतीय सैन्यातर्फे हे बंड मोडण्यात आले. बंडात सामील असणार्‍या सैनिकांवर जेल मध्ये शिक्षा भोगण्याची कारवाई सुध्दा झाली पण '''''जेल मधुन सुटल्यावर या सैनिकांना पुन्हा भारतीय सैन्यात सामावुन घेण्यात आले.'''''
 
बीबीसी वृतवाहिनीला रामगढ येथील विद्रोहात सहभाग घेतलेले सैनिक बलजीत सिंह यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
 
"मी शीख रेजिमेंटल सेंटर रांची मध्ये होतो. १० जून ला जवानांनी गुरुद्वार्‍यात अमृतसरला जाण्याची शपथ घेतली. दुपारीच काही तुकड्यांत १६०० जवान निघाले. यावेळी ब्रिगेडियर एस. सी. पुरी यांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या वर गोळ्या चालवल्या गेल्या त्यात ते मारले गेले. माझे वडिल हे येथे कॅप्टन होते पण त्यांचे आम्ही ऐकले नाही. आमच्या कडे एमएमजी, एलएमजी, ग्रेनेडस होते. पण पुढील दिवशीच जोनपुर, लखनऊ व कानपुरकानपूर मध्ये आम्हाला अडवण्यात आले. यानंतर जेलची शिक्षा झाली आणि जेल मधुन सुटल्यानंतर पुन्हा सैन्यात प्रवेश मिळाला व मी पुढील १७ वर्षे नोकरी केली."
 
==संदर्भ आणि नोंदी==