"राग (भावना)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{भावना}} जे इच्छेविरुद्ध घडते, जे स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाच...
 
No edit summary
ओळ ३०:
==रागाचे परिणाम==
* रागावणारी व्यक्ती ज्या व्यक्तीवर रागावते, त्या व्यक्तीस मानसिक त्रास होतो. रागाचे प्रमाण जास्त आणि अयोग्य असेल तर समोरच्या व्यक्तीमध्ये नैराश्‍याची; तसेच तीव्र रागाची भावना निर्माण होऊ शकते. नंतर तो कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, हे सांगता येत नाही. यातून भांडण-तंटा, मारामारी किंवा इतर टोकाच्या घटना घडू शकतात.
* साधारणपणे आपल्या जवळच्या म्हणजे घरातील व्यक्तीवरच राग व्यक्त करण्याची सवय असते. कारण बाहेर आलेला राग त्या ठिकाणी व्यक्त करता येऊ न शकल्याने अशा व्यक्ती तो राग दडपून टाकते. मग घरी आल्यानंतर ज्या व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहेत किंवा मृदूमृदु स्वभावाच्या आहेत, त्यांच्यावर हा राग काढला जातो. म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर!
* या अशा सतत व्यक्त होणाऱ्या रागामुळे घरातील मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. त्यांच्यामध्ये भीती, नैराश्‍य, न्यूनगंडाची भावना आणि त्यातूनही पुन्हा रागाचा उद्रेक होऊन तो इतरांना घातक ठरू शकतो. म्हणूनच कौटुंबिक प्रगतीला अडथळा निर्माण होतो.
* राग अनावर असणाऱ्या व्यक्तीच्या सहवासातील व्यक्तींच्या मानसिकतेवर आणि व्यक्तिमत्त्वावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतात. नातेसंबंध बिघडतात, कामावर समाजव्यवस्थेचा परिणाम होतो.