"मराठी नाट्यसंगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २४:
किर्लोस्करी नाटकांतील संगीतावर कर्नाटकातील यक्षगानाचा प्रभाव होता. महाराष्ट्रातील कीर्तनपरंपरेचे व लोकसंगीताचे अंश (दिंडी, साकी, लावणी), जयदेवांच्या गीतगोविंदाचे प्रतिबिंब, आणि शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायला जाणारा टप्पा हा प्रकारही नाट्यगीतांत वापरलेला दिसतो.
 
नाट्यसंगीतामुळे वेगवेगळ्या रागांचा प्रसार झाला. नाथ हा माझा (यमन), आनंदे नटती (मल्हार), उगवला चंद्र पुनवेचा (मालकंस), कठीण कठीण किती, पुरुष हदय बाई (यमनकल्याण), कटु योजना ही विधीची (शंकरा), अनृतचि गोपाला (सूरदासी मल्हार), एकला नयनाला विषय तो झाला (पहाडी), कृष्ण माझी माता (बागेश्री), कोण अससी तू नकळे मजला (जोगकंस), खरा तो प्रेमा (पहाडी - मांड), गुरू सुरस गोकुळी (जयजयवंती), जय गंगे भागीरथी (कलावती), जय शंकरा गंगाधरा (अहिरभैरव), जयोस्तुते उषादेवते (देसकार), झणी दे कर या (अडाणा), तळमळ अति अंतरात (सोहनी) अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील. याशिवाय अनेक संतरचना नाट्यसंगीत म्हणून वापरल्या गेल्या आणि विविध रागांत त्यांची अनेक रूपे रसिकांच्या मनात ठसली. अवघाची संसार सुखाचा करीन (धानी), अगा वैकुंठीच्या राया (भैरवी), अमृताहुनीअमृताहुनि गोड, देवा धरिले चरण (भीमपलास), देवा तुझा मी सोनार (जौनपुरी) या नाट्यगीतांचा उल्लेख या संदर्भात करता येईल.
 
नाट्यसंगीताचे अनेक प्रवाह विविध कालखंडांत निर्माण झाले, त्यांना रसिकाश्रय लाभला. किर्लोस्करी काळातील नाट्यसंगीतावर कीर्तन परंपरेचा प्रभाव होता. घरगुती पण वास्तववादी अशी ही नाटके होती. विषयही बहुधा पौराणिक असत. उदा. शाकुंतल, सौभद्र, द्रौपदी, सावित्री, मेनका, आशानिराशा, रामराज्यवियोग, विधिलिखित. त्यानंतर देवलांच्या ‘शारदा’ ने अतिशय सोपी, सहज पण प्रासादिक पदे नाट्यसंगीतात आणली. त्यात माधुर्य होते आणि जिव्हाळाही होता. शिवाय एक सामाजिक भानही या पदांमध्ये होते. उदा. शारदा, संशयकल्लोळ, मृच्छकटिक या नाटकांतील रचना. कृ. प्र. खाडिलकरांची पदे ओजोगुणयुक्त आणि आदर्शवादी आहेत. हे स्वयंवर, मानापमान, विद्याहरण, द्रौपदी, मेनका, त्रिदंडीसंन्यास यातील नाट्यपदे ऐकल्यानंतर लक्षात येते. सुभाषितांचे मोल यातील काही पदांना मिळाले, हेही एक वैशिष्ट्य मानावे लागेल. स्वकुलतारक सुता, मी अधना न शिवे भीती मना, शूरा मी वंदिले, प्रेमसेवा शरण, तव जाया नृपकन्या ही ‘सुभाषितांची’ उदाहरणे होत. किर्लोस्कर, खाडीलकर, देवल यांच्यापेक्षा निराळा बाज गडकरी, सावरकर, वरेरकर, जोशी, रांगणेकर यांनी नाट्यगीतांतून पुढे आणला. नाट्यपदांची रचना अधिक काव्यमय, सोपी, गायनानुकूल झाली. नाट्यपदांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली. हा बदल रसिकांनाही भावला.
ओळ ३२:
==अन्य माहिती==
काही वेळा संगीत नाटकापेक्षा त्यातील पदांच्या ध्वनिमुद्रिकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. उगवला चंद्र पुनवेचा (बकुळ पंडित), ऐसा महिमा प्रेमाचा (रतिलाल भावसार), काटा रुते कुणाला (अभिषेकीबुवा), गुलजार नार ही मधुबाला (वसंतराव देशपांडे), दान करी रे (रामदास कामत), मर्मबंधातली ठेव ही (प्रभाकर कारेकर), मधुमीलनात या विलोपले (आशा भोसले), मानसी राजहंस पोहतो (ज्योत्स्ना भोळे) अशा नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिका अतिशय लोकप्रिय झाल्या आणि आजही आहेत. लोकप्रिय ध्वनिमुद्रिकांची असंख्य उदाहरणे देता येतील.
शाकुंतल, सौभद्र या नाटकांच्या काळात नाटकांतील पदांची सं‘या भरघोस होती. त्यामुळे नाटके रात्रभर चालत असत. बोलपटांच्या आगमनाने दोन-तीन तासांची कमरणूक सहज उपलब्ध झाल्याने संगीत नाटकांची गरज कमी होत गेली. तसेच या काळात संगीत नाटकाने बदलत्या काळाशी जुळवून घेणे नाकारल्याने नाट्यसंगीतही मागे पडत गेले. ‘नाट्यमन्वंतर’ या नाट्यसंस्थेच्या कुलवधू, आंधळ्यांची शाळा, भूमिकन्या सीता आदीआदि नाटकांनी १९४० च्या दशकात काही बदल करून आटोपशीर नाट्यसंगीत रसिकांसमोर आणले. त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला.
 
==संगीत रंगभूमीवरील काही महत्त्वाचे कलाकार==