"श्रीकांत जिचकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय राजकारणी
Content deleted Content added
नवीन पान: <ref>http://www.rediff.com/news/2004/jun/02shri.htm</ref>श्रीकांत जिचकार हे महाराष्ट्रातील एक प्रम...
(काही फरक नाही)

१०:०२, ३ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

[१]श्रीकांत जिचकार हे महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. त्यांनी अल्पावधीमध्ये मिळवलेल्या बहुआयामी यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते प्रसिद्ध होते.

शिक्षण

त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरवात हि एम.बी.बी.स. अभ्यासक्रमापासून केली.त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यासक्रम घेवून एल.एल.म. पदवी घेतली. त्यांनी १९९० पर्यंत एकूण ४२ विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या व यातील २८ परीक्षांमध्ये सुवर्णपदक ,इतर परीक्षांमध्ये प्रथम वर्ग मिळवला. विद्यापीठाची सर्वात मोठी पदवी डी.लिट.ही संस्कृत या विषय मध्ये मिळवली. त्यांचे नाव हे भारतामधील सर्वात जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून घेतले जाते. यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.

सामाजिक

त्यांनी १९७८ मध्ये भारतीय पोलीस सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली व १९८० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले. ४ महिन्यामध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी या सेवेचा राजीनामा दिला. ते महाराष्ट्राच्या विश्वकोश निर्मितीचे प्रमुख सभासद होते.

राजकीय

त्यांची महाराष्ट्र विधानसभेमध्ये सर्वात तरुण सभासद म्हणून १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवड झाली. १२ वर्षे त्यांनी विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता .१९९२ मध्ये त्यांची राज्यसभेमध्ये निवड झाली . त्यांनी १९९८ सालापर्यंत राज्यसभेमध्ये काम केले. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो व युनिस्को संघटनांसाठी ही काम केले.

निधन

श्रीकांत जिचकार यांचे निधन २००४ साली नागपूर जवळ एका कार अपघातामध्ये झाले.

  1. ^ http://www.rediff.com/news/2004/jun/02shri.htm