"मेथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र :Illustration Trigonella foenum-graecum0 clean.jpg|right|thumb|मेथी]]
'''मेथी'''(शास्त्रीय नाव: ''Trigonella foenum-graecum'', ''ट्रिगोनेला फीनम-ग्रासम'') ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया (मेथीदाणे) या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने व मोड आलेले मेथीदाणे हे भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.
[[चित्र:मेथी.jpg|thumb|मेथीची जुडी]]
==उत्पादन==
[[नेपाळ]], [[भारत]], [[पाकिस्तान]], [[बांगलादेश]], [[अर्जेंटिना]], [[इजिप्त]], [[फ्रान्स]], [[स्पेन]], [[तुर्कस्तान]], [[मोरोक्को]] आणि [[चीन]] या देशांत मेथीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. भारतात [[राजस्थान]] राज्यात मेथीचे सर्वांत जास्त उत्पादन होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेथी" पासून हुडकले