"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९५ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: sa:प्रश्नोपनिषत्; cosmetic changes
छो (r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: hi:प्रश्नोपनिषद)
छो (r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: sa:प्रश्नोपनिषत्; cosmetic changes)
# [[कबन्धी]] कत्यऋषीचा प्रपौत्र

== ॥ शांतिपाठ ॥ ==
'''ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः। भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः॥

'''स्थिरैरङ्गैस्तुष्टवांसस्तनूभिः। व्यशेम देवहितं यदायुः॥

'''स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः॥

'''स्वस्ति नस्तार्क्ष्योऽरिष्टनेमिः। स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥

'''ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः'''

हे देवांनो, आम्ही [[यजन]] करताना, आराधना करताना आमच्या कानांनी मंगलकारक शब्द ऐकावेत, डोळ्यांनी शुभ पहावे. सुदृढ [[अवयव]] आणि आरोग्यसंपन्न शरीरे असणारे आम्ही परमात्म्याची स्तुती करत त्याच्या ऊपयोगास येईल असे आयुष्य भोगावे. ज्याची कीर्ती सर्वत्र श्रुत आहे असा [[इंद्र]] आमचे कल्याण करो; सर्व विश्वाचे ज्ञान असणारा पूषन्‌ ([[सूर्य]]) आमचे कल्याण करो; अरिष्टांचे निराकरण करणारा '''तार्क्ष्य''' ([[गरुड वैनतेय|गरुड]]) आमचे कल्याण करो आणि [[बृहस्पती]] आमचे कल्याण करो. हे परमात्मन्‌, आमच्याकरता [[भूलोक]], [[भुवर्लोक]] व [[स्वर्गलोक]] या तिन्ही लोकी शांती असो.

== प्रथम प्रश्न ==

'''ॐ सुकेशा च भारद्वाजः शैब्यश्च सत्यकामः सौर्यायणी च गार्ग्य: कौसल्याश्चाश्वलायनो भार्गवो

'''वैदर्भिः कबन्धी कात्यायनस्ते हैते ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठाः परं ब्रह्मान्वेषमाणा एष ह वै तत्सर्वं

'''वक्ष्यतीति ते ह समित्पाणयो भगवन्तं पिप्पलादमुपसन्नाः ॥१॥'''

[[भारद्वाज|भारद्वाजकुलोत्पन्न]] सुकेशा, [[शिबि]]चा पुत्र सत्यकाम, सूर्याचा नातू [[गर्ग]] ऋषींच्या गोत्रात जन्मलेला सौर्यायणी, कोसलदेशनिवासी [[आश्वलायन]], '''विदर्भ'''देशनिवासी [[भार्गव]] आणि [[कात्यायन]] अर्थात कत्य ऋषींचा नातू कबन्धी, हे सर्व वेदपरायण आणि वेदनिष्ठ [[ब्राह्मण]] होते. स्वत: [[परब्रह्म|परब्रह्माचे]] स्वरूप समजावून घ्यावे अशी इच्छा धरून ते परब्रह्माचा शोध घेत फिरत होते. हातात [[समिधा]] घेतलेले हे सहाहीजण [[पिप्पलाद]] नावाच्या सुविख्यात ऋषींकडे आले. कारण [[परब्रह्म|परब्रह्माचे]] स्वरूप समजावून सांगण्यास [[पिप्पलाद]] ऋषी समर्थ आणि उत्सुक आहेत असे त्यांना समजले होते. ॥१॥

'''तान्ह स ऋषिरुवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरं संवत्स्यथ यथाकामं प्रश्नान्पृच्छत

'''यदि विज्ञास्यामः सर्वं ह वो वक्ष्याम इति ॥२॥'''

त्यांना ते [[पिप्पलाद ऋषी]] म्हणाले "तुम्ही [[ब्रह्मचर्य]] [[व्रत]] पाळून, [[तप]] करून एक वर्षभर येथे राहा. नंतर इच्छेप्रमाणे प्रश्न विचारा. जर आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे ज्ञात असतील तर आम्ही सर्व काही समजावून सांगू." ॥२॥

'''अथ कबन्धी कात्यायन उपेत्य प्रपच्छ।
भगवन्‌ कुतो ह वा इमाः प्रजाः प्रजायन्त इति ॥३॥'''

मग सर्वप्रथम कात्यायन कबन्धीने पिप्पलादांपाशी जाऊन प्रश्न विचारला "भगवन्‌, ही सर्व प्रजा - जीवजंतू, मनुष्यादि प्राणी - कोठून निर्माण झाली?" ॥३॥

'''तस्मै स होवाच प्रजाकामो वै प्रजापतिः स तपोऽतप्यत स तपस्तप्त्वा स मिथुनमुत्पादयते।

'''रयिं च प्राणं चेत्येतौ मे बहुधा प्रजाः करिष्यत इति ॥४॥'''

यावर पिप्पलाद उत्तरले "प्रजापती परमात्म्याला [[प्रजा]] उत्पन्न करण्याची इच्छा झाल्यावर त्याने तप करून प्रथम ''''रयि'''' आणि ''''प्राण'''' असे [[मिथुन]] ('''जोडपे''') निर्माण केले. रयि आणि प्राण यांनी मिळून सारी [[सृष्टी]] निर्माण करावी या हेतूने [[प्रजापती]] परमात्म्याने या दोघांची निर्मिती केली."
(जीवसृष्टीतील चैतन्य म्हणजे 'प्राण' (energy) आणि सर्व जड सृष्टी म्हणजे 'रयि' (matter) अशी संकल्पना आहे.)

'''आदित्यो ह वै प्राणो रयिरेव चन्द्रमा रयिर्वा एतत्‌ सर्वं यन्मूर्तं चामूर्तं च तस्मान्मूर्तिरेव रयिः ॥५॥'''
उदाहरणादाखल पिप्पलाद महर्षी सांगतात "[[सूर्य]] व [[चंद्र]] हे अनुक्रमे प्राण आणि रयि आहेत. सूर्यामुळेच सर्व जड तत्वांमध्ये [[ऊर्जा]], चैतन्य असते; तर चंद्रामध्ये सर्व जड तत्वांचे पोषण करण्याची शक्ती असते." ॥५॥

'''अथादित्य उदयन्यत्प्राचीं दिशं प्रविशति तेन प्राच्यान्‌ प्राणान्‌ रश्मिषु संनिधत्ते।

'''यद्दक्षिणां यत्प्रतीचीं यदुदीचीं यदधो यदूर्ध्वं यदन्तरा दिशो यत्सर्वं प्रकाशयति तेन सर्वान्‌ प्राणान्‌ रश्मिषु संनिधत्ते ॥६॥'''

तोच विश्वरूप सूर्य वैश्वानर नावाने सर्व प्राण्यांच्या शरीरात जठराग्नि होतो. हेच तथ्य ऋचांमध्ये स्पष्ट केले आहे. ॥७॥

'''विश्वरूपं हरिणं जातवेदसं। परायणं ज्योतिरेकं तपन्तम्‌।

'''सहस्ररश्मिः शतधा वर्तमानः। प्राणः प्रजानामुदयत्येष सूर्यः ॥८॥'''

विश्वरूप, हरि म्हणजे किरणांनी युक्त असणारा, जन्माला आलेल्या सर्वांबद्दल ज्ञान असलेला, सर्वांचा आधार, तेजरूप आणि अतिशय [[उष्ण]] असलेला, हजारो किरणांनी युक्त आणि शेकडो रुपांत वर्तमान राहणारा, उत्पन्न झालेल्या सर्व जीवांचा [[प्राण]] असणारा हा [[सूर्य]] उदय पावतो व सर्व कार्ये करतो. ॥८॥

'''संवत्सरो वै प्रजापतिस्तस्यायने दक्षिणं चोत्तरं च ।

'''तद्ये ह वै तदिष्टापूर्ते कृतमित्युपासते ते चान्द्रमसमेव लोकमभिजयन्ते ।

'''त एव पुनरावर्तन्ते तस्मादेव ऋषय: प्रजाकामा दक्षिणं प्रतिपद्यन्ते ।

'''एष ह वै रयिर्य: पितृयाण: ॥९॥'''

[[संवत्सर]] - [[वर्ष]] हा [[प्रजापती]] होय. या संवत्सराचे [[उत्तरायण]] आणि [[दक्षिणायन]] असे दोन भाग आहेत. अनित्य हेच नित्य आहे असे मानून जे उपासक त्याप्रमाणे आचार करतात, लोकोपयोगी कामे(सार्वजनिक सुखसोयी, यज्ञादी कर्मे) करतात, ते लोक चंद्रलोकापर्यंत जाऊन तेथे जय पावतात आणि तेच पुन्हा फिरून या जगात जन्माला येतात. [[मानव]] आणि इतर प्राणिवर्गादी प्रजांचे हित इच्छिणारे [[ऋषी]] म्हणून मान्यता पावलेले हे लोक [[स्वर्ग]] अस्तित्वात असून तो यज्ञयागाने, लोकोपयोगी कर्माने मिळतो अश्या श्रद्धेने कर्म करून [[दक्षिणायन|दक्षिणायनाचा]] आश्रय घेतात. गमनागमनाच्या या मार्गाला पितृयाण असे म्हणतात. जड सृष्टीच्या परिपोष करण्याचा हा मार्गच रयि होय. ॥९॥

'''अथोत्तरेण तपसा ब्रम्हचर्येण श्रद्धया विद्ययाऽऽत्मानमन्विष्यादित्यमभिजयन्ते ।

'''एतद्वै प्राणानामायतनमेतदमृतमभयमेतत्परायणमेतस्मान्न पुनरावर्तन्त इत्यैषः निरोध: तदेषः श्लोक: ॥१०॥'''

[[तप]], [[ब्रम्ह्चर्य]],श्रद्धा आणि विद्या यांच्या साहाय्याने आत्मरूपाची ओळख करून घेणारे आदित्य लोकाची प्राप्ती करून घेतात. ह्याला [[उत्तरायण]] असे म्हणतात. आदित्य हा प्राणिमात्रांचे वसतिस्थान आहे. हा आदित्य [[अमृत]] प्रदान करणारा आणि सर्वाना आश्रयभूत असणारा आहे. या [[आदित्य]] लोकाची प्राप्ती झाली असता पुन्हा [[जन्म]] येत नाही असा अबाधित नियम आहे. ॥१०॥

'''पञ्चपादं पितरं द्वादशाकृतिं दिव आहु: परे अर्थे पुरीषिणम् ।

'''अथेमे अन्य उ परे विचक्षणं सप्तचक्रे षडर आहुरर्पितमिति ॥११॥'''

[[मास]] (महिना) हा [[प्रजापती]] आहे. या मासाचा [[कृष्णपक्ष]] हा रयि आणि [[शुक्लपक्ष]] हा प्राण आहे. [[ऋषी]] शुक्लपक्षामध्ये आणि इतर लोक कृष्णपक्षामध्ये आपली इष्ट कर्तव्यें करतात. ॥१२॥

'''अहोरात्रौ वै प्रजापतिस्तस्याहरेव प्राणो रात्रिरेव रयि: प्राणं वा एते प्रस्कन्दन्ति

'''ये दिवा रत्या संयुज्यन्ते ब्रम्हचर्यमेव तद्यद्रात्रौ रत्या संयुज्यन्ते ॥१३॥'''

[[अन्न]] हाच [[प्रजापती]] आहे. अन्नापासून रेताची उत्पत्ती होते आणि या [[रेत|रेतापासून]] सर्व प्रकारची प्रजा निर्माण होते. ॥१४॥

'''तद्येह् वै तत्प्रजापतिव्रत् चरन्ति ते मिथुनमुत्पादयन्ते ।

'''तेषामवैष ब्रम्हलोको येषां तपो ब्रम्हचर्य येषु सत्यं प्रतिष्ठितम् ॥१५॥'''

इति प्रश्नोपनिषदि प्रथम प्रश्नः ॥

== द्वितीय प्रश्न ==

'''अथ हैनं भर्गवो वैदर्भि: पप्रच्छ ।'''
इति प्रश्नोपनिषदि व्दितीय: प्रश्न: ॥

== तृतीय प्रश्न ==

'''अथ हैनं कौशल्यश्चाश्वलायन: पप्रच्छ ।'''
इति प्रश्नोपनिषदि तृतीयः प्रश्नः ॥

== चतुर्थ प्रश्न ==

'''अथ हैनं सौर्यायणि गार्ग्यः पप्रच्छ ।'''
इति प्रश्नोपनिषदि चतुर्थः प्रश्नः ॥

== पंचम प्रश्न ==

'''अथ हैनं सैब्यः सत्यकामः पप्रच्छ ।

'''स यो ह वै तभ्दगवन्मनुष्येषु प्रायणान्तमोङ्कारमभिध्यायीत ।

'''कतमं वाव स तेन लोकं जयतीति । तस्मै स होवाच ॥ १ ॥'''

पिप्पलाद त्याला म्हणाले, 'हे सत्यकामा जे पर आणि अपर असे ब्रम्ह आहे तेच हा ॐ कार आहे. त्यामुळे याचे ज्ञान असणारा मनुष्य याच्याच एका आयतनाने (जप, स्मरण आणि चिंतनाने) त्या दोन ब्रम्हातील एका ब्रम्हाचे अनुसरण करतो. ॥२॥

'''स यध्येकमात्रमभिध्यायीत स तेनैव संवेदितस्तूर्णमेव जगत्याभिसंपध्यते ।

'''तमृचो मनुष्यलोकमुपनयन्ते स तत्र तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संपन्नो महिमानमनुभवति ॥ ३ ॥'''

जर त्याने ॐ कारच्या एकाच भागाचे (अ या मात्रेचे) ध्यान केले अर्थात एक मात्रेचे त्याचे स्पंदन उत्पन्न होईल असा उच्चार आणि अशी धारणा केली तर त्याने तो मृत्युनंतर अशा सुखाला आणि ऎश्वर्याला पात्र होईल की त्यासाठी तो मानवयोनीतच पुन्हा जन्म घेईल. तेथे क्रग्वेदाची व्याप्ती आहे. त्यामुळे त्याची क्रग्वेदाकडे प्रवृत्ती होईल. तेथे तपश्चर्या, ब्रम्हचर्य आणि श्रद्धा यांनी युक्त असा तो ऎश्वर्ययुक्त होऊन राहील. पुढे त्याच्या तपाने तो अधिकाधिक श्रेष्ठ सुख प्राप्त करील. ॥३॥

'''अथ यदि द्विमात्रेण मनसि संपध्यते सोऽन्तरिक्षं यजुर्भिरुन्नीयते सोमलोकम् ।

'''स सोमलोके विभुतिमनुभूय पुनरावर्तते ॥ ४ ॥'''

आणि जर दोन मात्रांच्या ॐकाराचा उच्चार (अ+उ) तो मनाची एकाग्रता ठेवून करील तर यजुर्वेदातील क्रचांची प्रेरणा मिळून तो सोम (चंद्र) लोकापर्यंत जाईल. सोमलोकात सुख भोगून तो पुन्हा दृश्य जगतात जन्माला येईल. ॥४॥

(एक मात्रेचा ॐकार म्हणजे ओऽम्. दोन मात्रांचा ॐकार म्हणजे ओऽऽम्. तीन मात्रांचा ॐकार म्हणजे ऒऽऽऽम्. हे म्हणण्याचा, षड्जापासून निषादापर्यंत कोणता स्वर आपण म्हणावा ही गोष्ट गुरूगम्य आहे.)

'''यः पुनरेतं त्रिमात्रेणोमित्येतेनैवाक्षरेण परं पुरुषमभि-ध्यायीत स तेजसि सूर्ये संपन्नः ।

'''यथा पादोदरस्त्वचा विनिर्भुच्यत एवं ह वै स पाप्मना विनिर्भुक्तः स सामभिरुन्नीयते

'''ब्रह्मलोकं स एतस्माज्जीवघनात् परात्परं पुरुशयं पुरुषमीक्षते । तदेतौ श्लोकौ भवतः ॥ ५ ॥'''

पण जो तीन मात्रांच्या (अ उ म )ॐकाराच्या या अक्षरानेच या परम पुरूषाचे अंतरंगात ध्यान करील तो तेजोमय सूर्यलोकी जातो. ज्याप्रमाणे साप कात टाकून मोकळा होतो त्याचप्रमाणे तोही पापांपासून सर्वथा मुक्त होतो. तो 'साम' वेदातील क्रचांनी ब्रम्हलोकात नेला जातो. तो या जीव समुदायापेक्षा खूप उच्च अशा देहरूपी पुरीत राहणार्‍या परम पुरूषाला अर्थात पुरुषोत्तमाला पाहू शकतो. त्याला परमेश्वराचा साक्षात्कार होतो. हे स्पष्ट करणारे दोन श्लोक पुढीलप्रमाणे आहेत. ॥५॥

'''तिस्रो मात्रा मृअत्युमत्यः प्रयुक्ता अन्योन्यसक्ताः अनविप्रयुक्ताः ।

'''क्रियासु बाह्याभ्यन्तरमध्यमासु सम्यक् प्रयुक्तासु न कम्पते ज्ञः ॥ ६ ॥'''

ॐ च्या अ, उ आणि म या तीन मात्रा; एक दुसरीशी जोडलेली अशा किंवा वेगवेगळ्या म्हटल्या तरीही त्रिलोकापर्यंतच त्यांची गती असल्यामुळे त्यांचा प्रयोग करणारा कितीही उच्च अवस्थेपर्यंत गेला तरी त्याची मृत्युपासून, मृत्युच्या या त्रैलोक्यमय क्षेत्रापासून मुक्ती होत नाही. पण त्यांचा अ=बाह्य, उ=अंतरातील आणि म=त्यांच्या मधील क्रियांमध्ये सम्यक; योग्य प्रकारे उपयोग केला तर ज्ञानी म्हणजे परमेश्वराचे ज्ञान झालेला मनुष्य विचलित होत नाही. अविनाशी ब्रम्हाशीच एक्याने राहतो. म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि भावनामय सर्व क्रियांत प्रणवाचे ध्यान आणि प्रणववाच्या परब्रम्हाचे ध्यान अखंड ठेवावे म्हणजे आत्मस्वरूपापासून तो साधक च्युत होत नाही, जन्ममरणाच्या फेर्‍यात पडत नाही. ॥६॥

'''ऋग्भिरेतं यजुर्भिरन्तरिक्षं सामभिर्यत् तत् कवयो वेदयन्ते ।

'''तमोङ्कारेणैवायतनेनान्वेति विद्वान् यत्तच्छान्तमजरममृतमभयं परं चेति ॥ ७ ॥'''

इति प्रश्नोपनिषदि पञ्चमः प्रश्नः ॥

== षष्ठम प्रश्न ==
'''अथ हैनं सुकेशा भारद्वाजः पप्रच्छ ।

'''भगवन् हिरण्यनाभः कौसल्यो राजपुत्रो मामुपेत्यैतं प्रश्नमपृच्छत ।'''

'''षोडशकलं भारद्वाज पुरुषं वेत्थ । तमहं कुमारम्ब्रुवं नाहमिमं वेद ।'''

'''यध्यहमिममवेदिषं कथं ते नावक्ष्यमिति । समूलो वा एष परिशुष्यति योऽनृतमभिवदति तस्मान्नार्हम्यनृतं वक्तुम् ।'''

'''स तूष्णीं रथमारुह्य प्रवव्राज । तं त्वा पृच्छामि क्वासौ पुरुष इति ॥ १ ॥'''

'''स ईक्षाचक्रे । कस्मिन्नहमुत्क्रान्त उत्क्रान्तो भविष्यामि कस्मिन्वा प्रतिष्टिते प्रतिष्टस्यामीति ॥ ३ ॥'''

(त्या सोळा कला असलेल्या) पुरुषाने विचार केला (तपासून पाहिले) असे काय आहे की ते निघून गेल्यास मी ही निघून जाईन आणि ते स्थित असले तर मी ही स्थैर्याने स्थित होईन? ॥३॥

'''स प्राणमसृजत प्राणाच्छ्रद्धां खं वायुर्ज्योतिरापः पृथिवीन्द्रियं मनः । '''

'''अन्नमन्नाद्वीर्यं तपो मन्त्राः कर्म लोका लोकेषु च नाम च ॥ ४ ॥'''

त्याने प्रथम प्राणाची निर्मिती केली. प्राणातून श्रद्धा निर्माण केली. नंतर आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी (ही पंचमहाभूते) निर्माण केली. मग इन्द्रिये, मन, अन्न, अन्नापासून वीर्य, तप, मंत्र, कर्मे, विविध भू, भुवः आदि लोक आणि त्या लोकात विविध नामे निर्माण केली. अशा प्रकारे ह्या सोळा कला त्या (विश्वेश्वर परमात्म्याने विश्वात आणि आत्मरूप पुरुषाने शरीरात) पुरुषाने निर्माण केल्या. }}४॥

'''स यथेमा नध्यः स्यन्दमानाः समुद्रायणाः समुद्रं प्राप्यास्तं गच्छन्ति भिध्येते तासां नामरुपे समुद्र इत्येवं प्रोच्यते ।'''

'''एवमेवास्य परिद्रष्टुरिमाः षोडशकलाः पुरुषायणाः पुरुषं प्राप्यास्तं गच्छन्ति भिध्येते चासां नामरुपे पुरुष इत्येवं प्रोच्यते स एषोऽकलोऽमृतो भवति तदेष श्लोकः ॥ ५ ॥'''

नद्या वाहत वाहत समुद्राकडे जातात आणि समुद्रात त्या अस्त पावतात. मग त्यांची वेगवेगळी नावे आणि रूपे जातात आणि त्यांना समुद्रच म्ह्टले जाते. तसेच या सर्वसाक्षी परमात्म्याकडे या सोळा कला जातात आणि विलय पावतात. त्यांची वेगवेगळी नामरूपे नष्ट होतात आणि त्या सर्वांना पुरुष असे म्हटले जाते. तोच कलारहित आणि अमर, अविनाशी परमात्मा होय. त्या परमात्म्याविषयी श्लोक पुढील प्रमाणे आहे. ॥५॥

'''अरा इव रथनाभौ कला यस्मिन्प्रतिष्टिताः । तं वेध्यं पुरुषं वेद यथ मा वो मृत्युः परिव्यथा इति ॥ ६ ॥'''
त्यानंतर पिप्पलाद मुनी त्या सर्वांना म्हणाले, परब्रम्हाचे एवढेच ज्ञान मला आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ (आणखी काही) नाही. ॥७॥

'''ते तमर्चयन्तस्त्वं हि नः पिता योऽस्माकमविध्यायाः परं परं तारयसीति ।'''

'''नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्यः ॥ ८ ॥'''

इति प्रश्नोपनिषदि षष्ठः प्रश्नः ॥

'''ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पष्येमाक्षभिर्यजत्राः ।'''

'''स्थिरैरङ्गैस्तुष्तुवाँसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ॥'''

'''स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।'''

'''स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥'''

'''ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥'''

[[ml:പ്രശ്നോപനിഷത്ത്]]
[[ru:Прашна-упанишада]]
[[sa:प्रश्नोपनिषत्]]
[[sa:प्रश्नोपनिषद्‍]]
[[uk:Прашна-упанішада]]
[[zh:六问奥义书]]
५१,०६८

संपादने