"डोकेदुखी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ms:Sakit kepala
No edit summary
ओळ १:
 
{{विस्तार}}
==सायनसमुळे डोकेदुखी==
डोकेदुखी, तुमच्‍या नाकाच्‍या वर आणि मागे असलेल्या हाडांच्‍या पोकळीतल्या सायनस मार्गात सूज आल्‍याने होते. सायनस तुंबल्‍यास किंवा त्‍यांना संसर्ग झाल्‍यास तो ताण तुमच्‍या डोक्‍यावर पडतो आणि तुम्‍हांला डोकेदुखी होते. हे दुखणे फार गंभीर व निरंतर असते, सकाळी सुरू होते आणि तुम्‍ही वाकलांत तर आणखीनच जास्‍त होते.
 
==सामान्‍य सायनस डोकेदुखीची लक्षणे==
डोळे, गाल आणि कपाळावर दबाव पडतो आणि खूप दुखते
वरच्‍या दातांमध्‍ये दुखल्‍यासारखे वाटणे
ताप व थंडी वाजून येणे
चेहर्‍यावर सूज येणे
शेक आणि बर्फ या दोन्हींचा उपयोग सायनस डोकेदुखीमधील चेहर्‍याची सूज घालविण्‍यासाठी करण्‍यात येतो.
 
==मानसिक ताणामुळे दुखणारे ==
मानसिक ताणामुळे किंवा स्‍नायूंच्‍या आकुंचनामुळे होणारी डोकेदुखी ही सर्वत्र आढळणारी सामान्‍य प्रकारची डोकेदुखी असते, आणि ताणाच्‍या काळाबरोबर ती देखील वाढत जाते.
मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी बहुतेक स्थिर व कमी त्रासदायक असते आणि कपाळ, कानशिले आणि मानेच्‍या मागील बाजूला जाणवते.
मानसिक ताणामुळे होणार्‍या डोकेदुखीचे वर्णन करतांना लोक असे म्‍हणतात की त्‍यांच्‍या डोक्‍याभोवती एखादा पट्टा फार करकचून बांधल्‍यासारखे वाटत आहे.
मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी जास्त वेळ टिकून राहत असली तरी ताणाचा काळ संपला की ती थांबते.
मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी इतर कुठल्‍याही लक्षणांशी निगडित नसते आणि मायग्रेन डोकेदुखीमध्‍ये कोणत्‍याही प्रकारची पूर्व-लक्षणे दिसून येत नाहीत. सर्व प्रकारच्‍या डोकेदुखींमागचे कारण 90 टक्के वेळा मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखीच असू शकते.
 
[[वर्ग:आरोग्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/डोकेदुखी" पासून हुडकले