"संजय गांधी राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
{{गल्लत|संजय राष्ट्रीय उद्यान}}
 
[[चित्र:Mumbai area locator map.svg|250px|right|thumb|[[मुंबई|मुंबईच्या]]नकाशात उत्तर भागातील हिरव्या रंगात दर्शविलेले]]
[[चित्र:SGNP-Bombay.jpg|300px|thumb|right|संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]]
[[मुंबई]] महानगरपालिकेच्या बाहेर (पण मुंबईच्या पंचक्रोशीत) हे राष्ट्रीय उद्यान आहे. याचे क्षेत्रफळ १०४ वर्ग किमी आहे.येथील कान्हेरी लेण्यांमुळे(कृष्णगिरी) म्हणजे ‘काळा पहाड’ ब्रिटिश आपदानीत वनविभागाची स्थापना झाल्यावर या वनविभागाचे सर्वेक्षण होऊन २०.२६ चौ. कि.मी. चे "कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान" निर्माण झाले. १९७४साली त्याचे नामकरण '[[बोरिवली]] राष्ट्रीय उद्यान' असे झाले. १९८१ मध्ये नावाचे बदल करून 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' असे त्याचे नामकरण झाले.
 
==जैव विविधता==
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रकारचे सस्तन प्राणी, जमिनीवर तसेच पाण्यात वावरणारे, विविध रंग, आकारांचे २५० प्रकारचे पक्षी, ३८ प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि ९ प्रकारचे उभयचर आहेत. या उद्यानात [[बिबट्या]] हा या वन साम्राज्यातला सर्वात मोठा भक्षक येथे वावरतो. तसेच [[मुंगूस]], [[उदमांजर]], [[रानमांजर]], [[अस्वल]], लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यतः [[करंज]], [[साग]], शिसव, [[बाभूळ]], [[बोर]], [[निवडुंग]], [[बांबू|बांबूची बेटं]] आढळतात.
 
==सुविधा==
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परीक्षेत दर्शनाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असते. येथे प्रवेशासाठी प्रौढांना रु. २०/- तर लहान मुलांना रु. १०/- प्रवेशशुल्क आहे. पर्यटकांच्या वाहन थांब्यासाठी शुल्क आकारले जाते. सिंहविहार आणि वनराणी मिनी टॉय ट्रेन सफारीचे आकारले जाते. उद्यानात वननिवासाची सोय असून त्याकरिता विश्रामगृह आणि कुटीर पद्धतीची निवास व्यवस्था आहे.
 
== बाह्यदुवे ==
[http://www.sanjaygandhinationalpark.net/ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान-संकेतस्थळ]
 
{{विस्तार}}
 
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}