"ऑपरेशन चॅस्टाइझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Mohne Dam Breached.jpg|thumb|right|हल्ल्यानंतर उध्वस्त झालेले मॉहने धरण]]
{{काम चालू}}
'''ऑपरेशन चॅस्टाइझ''' हे [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धदरम्यान]] १६-१७ मे १९४३ रोजी ब्रिटनच्या [[रॉयल एअरफोर्स]]तर्फे [[जर्मनी]]च्या धरणांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या कारवाईचे सांकेतिक नाव होते. या मोहिमेचे वैशिष्ट्य हे की खास या मोहिमेसाठी प्रथमच उसळणार्‍या बाँब (bouncing bomb) चा वापर क‍रण्यात आला. मुळात अशा विशिष्ट बाँबमुळेच ही कारवाई यशस्वी ठरली. लक्ष्यावर आदळल्यावर लगेच स्फोट न होता, उसळ्या घेत काही अंतर कापून फुटणारा हा बाँब बार्नेस वॉलिस यांनी शोधला व विकसित केला होता. या कारवाईअंतर्गत मॉहने धरण (Möhne) आणि एडरसी धरण (Edersee Dams ) उध्वस्त झाले, तर सोर्पे धरणास (Sorpe dam) जुजबी नुकसान झाले.
[[चित्र:Bouncing bomb dam.gif|thumb|right|उसळणार्‍या बाँबची कार्यपद्धती विषद करणारे चित्र. बाँब पृष्ठभागापासून कमी अंतरावरुन पाण्यात सोडला जातो, त्यानंतर तो उसळत पुढे जातो. काही वेळाने वेग कमी झाल्यावर तो पाण्यात बुडतो व स्फोट होतो.]]
Line ६१ ⟶ ६०:
प्रत्यक्षात जर्मनी मात्र काही आठवड्यांतच सावरला. मॉहने धरणात २५० रंदीचे व २९२ फुट उंच भगदाड पडले होते. त्यातुन ३३० मिलियन टन इतके पाणी रुर खोर्‍यात पसरले. पाण्याचा १० मीटर उंची प्रवाह २४ किमी च्या वेगाने नद्यांच्या खोर्‍यातुन गेला. त्यात काही खाणी बुडाल्या , ११ कारखाने , ९२ घ्ररेही उध्वस्त झाली तर ११४ कारखाने व ९७१ घ्ररे क्षतिग्रस्त झाली. ८० किमी पर्यंतच्या प्रदेशात पुराचे पाणी शिरले यात सुमारे २५ रस्ते , लोहमार्ग व पुले ही वाहुन गेले. विजेच्या उत्पादनात मोठा फटका बसला ५१०० किलोवॅट वीज उत्पादन करणारे दोन केंद्र उधवस्त झाली तर इतर ७ केंद्रांचे नुकसान झाले. यामुळे याभागातील वीजपुरवठा २ आठवड्यांपर्यंत गायब होता.
 
पण यासर्वातुन २७ जुन पर्यंत जर्मनीने पाणीपुरवठा पुर्ण पणे सुरळीत केला. तसेच विद्युत पुरवठाही पुर्ण क्षमतेने सुरु झाला. खोर्‍यातील जलवाह्तुकही पुर्ववत झाली. पण जर्मनीला यासाठी मदतकार्य युध्दपातळीवर हाती घ्यावे लागले. त्यासाठी आपले राखीव सैन्य व इतर सैनिक युध्दक्षेत्रातुन दुर असे मदतकार्यात राबवावे लागले. त्याचा युध्दातील आक्रमक धोरणांवर परिणाम झालाच पण यापुढील काळात मित्रराष्ट्रांनी केलेल्या हल्ल्यांदरम्यानही भोगावा लागला. इंग्लंड व मित्रराष्ट्रांसाठी हीच बाब फायद्याची ठरली व त्यांनी खास अशाप्रकारे मोहिमा आखुन जर्मनीला बलाढ्य लढाऊ नौकाही गमवावी लावली.