"उझबेकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५४:
ज्ञात इतिहासानुसार [[ताम्रयुग|ताम्रयुगापासून]] [[तारिम खोरे|तारिम खोर्‍याच्या]] परिसरात मानवी वस्तीस सुरुवात झाली. इ.स.पू. पहिल्या सहस्रकात [[इराणी लोक|इराणी]] भटक्यांचे मोठ्या प्रमाणात [[मध्य आशिया]]त स्थलांतर झाले. इराणी भाषाकुळातील भाषा बोलणारे हे लोक सध्याच्या उझबेकिस्तानाच्या भूप्रदेशातील गवताळ प्रदेशात स्थिरावले. इ.स.पू. ५व्या शतकात बाख्तरी, सोग्दाई, तुखार राज्ये या प्रदेशात उदयास आली. [[बुखारा]] व [[समरकंद]] ही शहरेदेखील सांस्कृतिक व राजकीय केंद्रे म्हणून प्रसिद्धीस आली. [[रेशीम मार्ग|रेशीम मार्गाद्वारे]] पश्चिमेकडील प्रदेशांशी व्यापारसंबंध वाढवायला [[चीन|चीनने]] जेव्हा सुरुवात केली, तेव्हा ही इराणी शहरे आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्रे बनली. विशेषकरून सोग्दाई व्यापार्‍यांनी वर्तमान उझबेकिस्तानातील मारवाननाहर प्रदेशापासून वर्तमान [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चिनी जनता-प्रजासत्ताकातील]] शिंच्यांग उय्गूर स्वायत्त प्रदेशापर्यंत पसरलेल्या इराणी वस्त्या-नगरांच्या जाळ्याच्या आधारावर भरपूर ऐश्वर्य कमवले. रेशीम मार्गावरील व्यापारामुळे बुखारा व समरकंद ही नगरे वैभवसंपन्न बनली.
 
इ.स.पू. ३२७च्या सुमारास [[महान अलेक्झांडर|महान अलेक्झांडराने]] सोग्दा व बाख्तरावर आक्रमण करून हा भूभाग जिंकला. त्याने [[रोक्साना]] नामक बाख्तरी राजकुमारीशी विवाह केला. मात्र ग्रीकांचे हे यश नीटसे स्थिरावू शकले नाही. कालांतराने अलेक्झांडराचे सैन्य स्थनिकांनी चालू ठेवलेल्या प्रतिकारापुढे नामोहरम झाले. पुढे अनेक वर्षे वर्तमान उझबेकिस्तानाच्या भूभागावर [[पार्थियन साम्राज्य|पार्थियन]] व [[सासानी साम्राज्य|सासानी]] इत्यादी इराणी साम्राज्यांची सत्ता होती. इ.स.च्या ८व्या शतकात [[अमूदर्या नदी|अमूदर्या]] व सिरदर्या नद्यांमधील ट्रान्सऑक्सियाना दुआबाचा भाग [[अरब|अरबांनी]] जिंकला. इ.स.च्या ९व्या व १०व्या शतकांत हा भाग [[सामानी साम्राज्य|सामानी साम्राज्यास]] जोडला गेला.
 
इ.स.च्या १३व्या शतकात [[चंगीझ खान|चंगीझ खानाच्या]] नेतृत्वाखालील [[मंगोल साम्राज्य|मंगोल]] फौजांचे आक्रमण या प्रदेशाच्या इतिहासास कलाटणी दिली. मंगोल आक्रमणात झालेल्या क्रूर कत्तलींमुळे येथील मूळच्या इंडो-पारसिक ''[[सिथियन|सिथियनांचा]]'' वंशसंहार घडला. सिथियनांचा सांस्कृतिक वारसा खंडित होऊन पुढील काळात येथे येऊन वसलेल्या मंगोल-तुर्क लोकांच्या संस्कृतीने मूळ धरले.
 
== भूगोल ==