"उझबेकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५३:
== इतिहास ==
ज्ञात इतिहासानुसार [[ताम्रयुग|ताम्रयुगापासून]] [[तारिम खोरे|तारिम खोर्‍याच्या]] परिसरात मानवी वस्तीस सुरुवात झाली. इ.स.पू. पहिल्या सहस्रकात [[इराणी लोक|इराणी]] भटक्यांचे मोठ्या प्रमाणात [[मध्य आशिया]]त स्थलांतर झाले. इराणी भाषाकुळातील भाषा बोलणारे हे लोक सध्याच्या उझबेकिस्तानाच्या भूप्रदेशातील गवताळ प्रदेशात स्थिरावले. इ.स.पू. ५व्या शतकात बाख्तरी, सोग्दाई, तुखार राज्ये या प्रदेशात उदयास आली. [[बुखारा]] व [[समरकंद]] ही शहरेदेखील सांस्कृतिक व राजकीय केंद्रे म्हणून प्रसिद्धीस आली. [[रेशीम मार्ग|रेशीम मार्गाद्वारे]] पश्चिमेकडील प्रदेशांशी व्यापारसंबंध वाढवायला [[चीन|चीनने]] जेव्हा सुरुवात केली, तेव्हा ही इराणी शहरे आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्रे बनली. विशेषकरून सोग्दाई व्यापार्‍यांनी वर्तमान उझबेकिस्तानातील मारवाननाहर प्रदेशापासून वर्तमान [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चिनी जनता-प्रजासत्ताकातील]] शिंच्यांग उय्गूर स्वायत्त प्रदेशापर्यंत पसरलेल्या इराणी वस्त्या-नगरांच्या जाळ्याच्या आधारावर भरपूर ऐश्वर्य कमवले. रेशीम मार्गावरील व्यापारामुळे बुखारा व समरकंद ही नगरे वैभवसंपन्न बनली.
 
इ.स.पू. ३२७च्या सुमारास [[महान अलेक्झांडर|महान अलेक्झांडराने]] सोग्दा व बाख्तरावर आक्रमण करून हा भूभाग जिंकला. त्याने [[रोक्साना]] नामक बाख्तरी राजकुमारीशी विवाह केला.
 
== भूगोल ==