"उझबेकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५०:
 
उझबेकिस्तानाची अर्थव्यवस्था [[कापूस]], [[सोने]], [[युरेनियम]], [[पोटॅशियम]], [[नैसर्गिक वायू]] इत्यादी नैसर्गिक संसाधनांच्या उत्पादनावर आधारित आहे. [[बाजाराभिमुख अर्थव्यवस्था|बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे]] वाटचाल करण्याचे अधिकृत जाहीर धोरण असूनही अर्थव्यवस्थेवर राष्ट्रीय शासनाची घट्ट पकड आहे. परकीय गुंतवणुकीसाठी ही बाब उत्साहवर्धक नसली, तरीही इ.स. १९९५ सालापासून उदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने नियंत्रित वाटचाल करणार्‍या शासकीय यंत्रणेने केलेले आर्थिक पुनरुज्जीवन आश्वासक आहे. देशांतर्गत व्यवस्थेतील [[मानवाधिकार]] व वैयक्तिक स्वातंत्र्य यांची स्थिती मात्र विवादास्पद राहिली असून त्याबद्दल आंतरराष्ट्रीय संघटनांकडून उझबेकिस्तानावर टीकाही झाली आहे<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://thereport.amnesty.org/eng/regions/europe-and-central-asia/uzbekistan | शीर्षक = ''ह्यूमन राइट्स इन उझबेकिस्तान'' (''उझबेकिस्तानातील मानवाधिकार'') | प्रकाशक = अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल | कृती = अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल अहवाल, इ.स. २००८ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
== इतिहास ==
ज्ञात इतिहासानुसार [[ताम्रयुग|ताम्रयुगापासून]] [[तारिम खोरे|तारिम खोर्‍याच्या]] परिसरात मानवी वस्तीस सुरुवात झाली. इ.स.पू. पहिल्या सहस्रकात [[इराणी लोक|इराणी]] भटक्यांचे मोठ्या प्रमाणात [[मध्य आशिया]]त स्थलांतर झाले. इराणी भाषाकुळातील भाषा बोलणारे हे लोक सध्याच्या उझबेकिस्तानाच्या भूप्रदेशातील गवताळ प्रदेशात स्थिरावले. इ.स.पू. ५व्या शतकात बाख्तरी, सोग्दाई, तुखार राज्ये या प्रदेशात उदयास आली. [[बुखारा]] व [[समरकंद]] ही शहरेदेखील सांस्कृतिक व राजकीय केंद्रे म्हणून प्रसिद्धीस आली. [[रेशीम मार्ग|रेशीम मार्गाद्वारे]] पश्चिमेकडील प्रदेशांशी व्यापारसंबंध वाढवायला [[चीन|चीनने]] जेव्हा सुरुवात केली, तेव्हा ही इराणी शहरे आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्रे बनली. विशेषकरून सोग्दाई व्यापार्‍यांनी वर्तमान उझबेकिस्तानातील मारवाननाहर प्रदेशापासून वर्तमान [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चिनी जनता-प्रजासत्ताकातील]] शिंच्यांग उय्गूर स्वायत्त प्रदेशापर्यंत पसरलेल्या इराणी वस्त्या-नगरांच्या जाळ्याच्या आधारावर भरपूर ऐश्वर्य कमवले. रेशीम मार्गावरील व्यापारामुळे बुखारा व समरकंद ही नगरे वैभवसंपन्न बनली.
 
== भूगोल ==