"अभिचालित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: (Relay / रिले). अगदी अल्प शक्तीचा उपयोग करून मोठ्या शक्तीच्या विद्युत...
 
छोNo edit summary
ओळ १:
{{कॉपीपेस्ट | लेख | दुवा = http://in.idn.cdac.in/vishwakosh/index.php?option=com_content&view=article&id=1224%3A2010-12-13-04-14-48&catid=1&Itemid=2 | दिनांक = १ नोव्हेंबर, इ.स. २०११ }}
(Relay / रिले). अगदी अल्प शक्तीचा उपयोग करून मोठ्या शक्तीच्या विद्युत् मंडलात पाहिजे तसा बदल घडवून आणणारे विद्युत् साधन. या साधनाचे विविध उपयोग असून मुख्यतः ते प्रेषणमार्गांच्या म्हणजे विद्युत् शक्ती लांब अंतरावर नेणाऱ्या तारांच्या रक्षणासाठी वापरण्यात येते. जेव्हा प्रेषणमार्गामधून वाहणारा विद्युत् प्रवाह अथवा त्यातील शक्ती ठराविक मर्यादेच्या बाहेर जातात, तेव्हा मोठा धोका टाळण्यासाठी अशा साधनाचा उपयोग करतात. तसेच जेव्हा एखादी विद्युत् यंत्रणा ठराविक वेळेपर्यंत बंद अथवा चालू ठेवावयाची असेल, तेव्हा तो अवधी निश्चित ठेवण्यासाठी या साधनाचा उपयोग करतात. या साधनाच्या मदतीने एखादी यंत्रणा निश्चित वेळी चालू करणे किंवा बंद करणे शक्य होते. दूर मापन (दूरअंतरावरून विद्युत् राशींचे मापन करणाऱ्या) उपकरणातही अशा साधनाचा उपयोग होतो.