"विभवांतर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विद्युतदाब-चर्चा या पानावरील टिप्पणीनुसार...
(काही फरक नाही)

२२:२०, ३१ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

विद्युतदाब, अर्थात व्होल्टेज (इंग्लिश: Voltage ;) म्हणजे एका बिंदूकडून दुसर्‍याकडे विद्युतप्रवाह वाहून नेणास कारणीभूत असणार्‍या दोन बिंदूंदरम्यान जी दोन बले असतात त्या वैद्युत बलांतील फरक होय. गणिती सूत्राच्या स्वरूपात विद्युतदाब म्हणजे दर एकक विद्युतभारामुळे निर्माण होणारी किंवा खर्च होणारी ऊर्जा. स्थिर विद्युतक्षेत्रांच्या संदर्भात दोन बिंदूंमधील विद्युतदाब म्हणजे त्या बिंदूंमधील वैद्युत वर्चोभेद होय. मात्र काळागणिक बदलणारे विद्युतक्षेत्र व चुंबकीय क्षेत्र असणार्‍या सर्वसाधारण संदर्भात या दोन संज्ञा समानार्थी ठरत नाहीत.

"सावधान! विजेच्या धक्क्याचा धोका" (आय.एस.ओ. ३८६४), अर्थात उच्च विद्युतदाब या रूढ नावाने ओळखल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय सुरक्षाचिन्हाचे चित्र

एकक

विद्युतदाब व्होल्टमीटरने मोजतात. व्होल्ट हे विद्युतदाबाच्या मोजमापाचे एकक आहे.

उपयोग

जितका दाब अधिक तितका विजेचा प्रवाह कमीतकमी गळतीने अधिक लांबवर पोहोचवता येतो. विद्युत केंद्राकडून हजारो किलोमीटर अंतरापर्यंत वीज पोहोचवली जाते. त्यासाठी उच्च दाबाची वीज तारांमधून वाहून नेली जाते. दाब जितका जास्त तितकी प्रवाह वाहून नेणार्‍या तारांची जाडी कमी ठेवता येते. दाब ४०० किलोव्होल्ट (चार लाख व्होल्ट), ३३० किलोव्होल्ट, २२० किलोव्होल्ट, ३३ किलोव्होल्ट, २२ किलोव्होल्ट, ११ किलोव्होल्ट इतका ठेवतात आणि विविध ठिकाणी असलेल्या वीज उपकेंद्रांपर्यंत (सब-स्टेशन्स) वीज पोहोचवली जाते. या प्रत्येक उपकेंद्रातून रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) साह्याने विजेचा दाब, ११००० व्होल्टपासून ४४० व्होल्टपर्यंत कमी करतात. मग तो परत एकदा रोहित्रावरून४४० व पुढे २३०पर्यंत आणखी कमी केला जातो. घरांत वापरण्यासाठी विजेच्या २३० व्होल्ट हा दाब बर्‍यापैकी सुरक्षित समजला जातो.

बाह्य दुवे