"गांधार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
==इतिहास==
[[इ.स.पू.चे ६ वे शतक|इ.स. पूर्व सहाव्या शतकात]] [[इराण]]चा सम्राट दरियस याने हा भाग जिंकून आपल्या साम्राज्याला जोडला होता. बर्याच वर्षांनी हा प्रदेश [[सम्राट अशोक|अशोकाच्या]] साम्राज्यात समाविष्ट झाला. त्यानंतर हा प्रदेश [[ग्रीक]] व इंडो पार्थियन यांच्या सात्तेखाली होता. पुढे जेव्हा तो [[कुषाण]] साम्राज्याचा भाग बनला तेव्हा पुरूषपूर (पेशावर) ही त्याची राजधानी बनली. [[गुप्त साम्राज्य|गुप्त]] काळी या प्रदेशावर यवन, शक इत्यादी परकीयांची सत्ता होती. [[इ.स.पू.चे ६ वे शतक|इ.स. चे सहावे]] ते [[इ.स.पू.चे १० वे शतक|दहावे शतक]] मूळचे [[तुर्की]] असणारे साही वंशाच्या राजांचे राज्य होते. त्यानंतर [[गझनी]]च्या महंमदाने हा प्रदेश जिंकला. तेव्हापासून इ.स. च्या [[इ.स.चे १८ वे शतक|अठराव्या शतकापर्यंत]] या भागावर निरनिराळ्या [[मुघल साम्राज्य|मोगल]] राजांनी राज्य केले. [[इ.स.चे १९ वे शतक|इ.स. च्या १९ व्या शतकाच्या]] प्रारंभी [[रणजितसिंग|रणजितसिंगाने]] हा प्रदेश आपल्या राज्याला जोडला आणि नंतर [[इ.स. १८४९]] साली तो [[इंग्रज|इंग्रजांच्या]] ताब्यात गेला.
 
----
"https://mr.wikipedia.org/wiki/गांधार" पासून हुडकले