"राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[जुलै]] [[इ.स. १९८२|१९८२]] मध्ये [[भारत|भारतात]] नाबार्ड (''[[इंग्लिश]]'' '''NABARD''' ''National Bank for Agriculture and Rural Development'') या शिखर [[बॅंक|बॅंकेची]] स्थापना करण्यात आली. पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे [[रिजर्व बॅंक]] करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर [[संस्था]] आहे.
==कामे==
*[[शेती]]क्षेत्र, [[लघुउद्योग]], ग्रामीण व [[कुटीरोद्योग]], हस्तोद्योग या क्षेत्रांना गुंतवणूक व उत्पादनकार्यासाठी वित्तपुरवठा करणे.
*[[राज्य सहकारी बॅंक]], क्षेत्रीय ग्रामीण बॅंका, [[भूविकास बॅंक|भूविकास बॅंका]] इत्यादींना अल्प मुदत, मध्यम व दीर्घमुदतीची कर्जे देणे.
*सहकारी सोसायट्यांचे [[भागभांडवल]] पुरविण्यासाठी नाबार्ड घटक राज्यसरकारांना वीस वर्षे मुदतीपर्यंतची दीर्घ मुदतीची कर्जे देऊ शकते.
*[[सहकारी बॅंक|सहकारी बॅंका]], राज्य सहकारी बॅंका व क्षेत्रीय ग्रामीण बॅंकांच्या कार्याची तपासणी करण्याचे अधिकार नाबार्डला देण्यात आलेले आहेत.
*शेतीक्षेत्राशी व ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित व मध्यवर्ती सरकारची मान्यता असलेल्या कोणत्याही संस्थेला दीर्घ मुदतीची ककर्जे नाबार्ड देऊ शकते. किंवा अशा संस्थांचे भागभांडवल विकत घेऊन अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करु शकते.
==वित्तीय साधनसामग्री==
कर्ज देण्यासाठी व आपल्या वित्तीय गरजा भागविण्यासाठी नाबार्ड मध्यवर्ती सरकार व [[जागतिक बॅंक|जागतिक बॅंकेकडून]] वित्तीय मदत घेऊ शकते. खुल्या भांडवलबाजारातून आवश्यक तेवढा पैसा उभारू शकते. अल्प मुदतीच्या व चालू खर्चाच्या पूर्ततेसाठी नाबार्ड रिझर्व बॅंकेवर अवलंबून आहे.
==बाह्य दुवे==
[http://www.nabard.org/| नाबार्डचे संकेतस्थळ]
 
{{विस्तार}}