"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७,८१० बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
विद्युत शरीररचना शास्त्र, या नव्या शाखेच्या विसाव्या शतकातील अभ्यासानंतर 1940 मध्ये चेतासंस्थेमध्ये उपजत संरचना (पॅटर्न) बनविण्याची यंत्रणा असते. या संरचना बनविण्यासाठी बाह्य संवेदाची गरज नसते असे समजले. चेतापेशी ठराविक वेळाने संवेद किंवा संवेद समूह आपोआप पाठवितात हे कळले. चेतापेशी पूर्णपणे वेगळी केली तरी हे चालूच राहते. चेतापेशी परस्पराशी जोडल्या गेल्यानंतर ही यंत्रणा अधिकच गुंतागुंतीची कामे करू लागते. सध्याच्या आधुनिक सिध्द्धांताप्रमाणे चेतासंस्थेचे कार्य संवेद प्रतिसाद साखळ्या आणि उपजत आवेग संरचनेच्या तयार होण्याने नियंत्रित होतात आणि प्राण्याचे वर्तन याच्या समुच्चयाने होते असे सिद्धझाले आहे.
 
== प्रतिक्षिप्त'''प्रतिक्षेपी क्रिया''' ==
प्रतिक्षेपी क्रिया
सर्वात चेतनी परिपथ म्हणजे प्रतिक्षेप चाप किंवा प्रतिक्षेप कमान. या परिपथामध्ये संवेदी चेतापेशी पासून आवेग सुरू होतो आणि प्रेरक चेतापेशीद्वारे स्नायूमध्ये किंवा ग्रंथीमध्ये संपतो. अगदी सोपे प्रतिक्षेपी चापाचे उदाहरण म्हणजे स्वयंपाक करताना बसलेला तव्याचा चटका. चटका बसणे आणि त्वरित हात भाजणा-या वस्तूपासून लांब जाणे प्रतिक्षेपी चापाद्वारे होते. चापाचा प्रारंभ संवेदी चेतापेशीद्वारे सुरू होतो. त्वचेमध्ये संवेदी चेतापेशींची असंख्य टोके आहेत. त्यामध्ये दाब, वेदना, उष्णता, थंडी असे विविध संवेद चेतापेशीद्वारे मध्यवर्ती चेतासंस्थेकडे नेले जातात. उष्णतेमुळे चेतामध्ये आवेग उत्पन्न होण्यासाठी ठराविक क्षमतेचा संवेद असावा लागतो. अक्षतंतूमध्ये कोणताही संवेद निर्माण होत नाही या स्थितीस स्थिर स्थिति (रेस्टिंग पोटेंशियल) म्हणतात. अशा स्थिर स्थितेमध्ये अक्षतंतूच्या बाहेर घन आयनांची संख्या अधिक आणि ऋण आयनांची संख्या अक्षतंतूमध्ये अधिक असते. अक्षतंतूची विद्युत स्थिति अशावेळी ऋण 70 मिलिव्होल्ट एवढी असते. (-70 mV) स्थिर स्थिति भार राखण्यासाठी अक्षतंतूच्या पटलामधून सोडियमचे आयन पेशीबाहेर वा पोटॅशियम आयन पेशीमध्ये आयन चॅनल मधून येतात वा जातात. पेशीतील अंतर्भाग संवेद वहन होत नाही अशा वेळेस ऋण70 मिलिव्होल्ट असण्याचे कारण म्हणजे पेशीमधील प्रथिने. प्रथिनांचा आयन भार ऋण असतो. सर्व ऋण आयन भार संतुलित करतील एवढे घन आयन पेशीमध्ये कधीही नसतात.
संवेद उत्पन्न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोडियम आयन पेशीमध्ये आणि पोटॅशियम आयन बाहेर जाण्याची गरज असते. कोणताही संवेद आला म्हणजे नेहमीचे सोडियम पोटॅशियम आयनांचे पेशीमधील प्रमाण बदलते. आतील आयन भार -70 मिलिव्होल्ट वरून +35 मिलिव्होल्ट झाला म्हणजे अक्षतंतू उत्तेजित झाला असे म्ह्णण्याची पद्धत आहे. +मिलिव्होट हे “क्रिया आयन भार” “अॅ क्शन पोटेंन्शियल” आहे. एकदा क्रिया आयन भार +35 मिलिव्होल्ट झाला म्हणजे त्याचे अक्षतंतूच्या ध्रुवतेनुसार वहन होते. संवेदी अक्षतंतू संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे तर प्रेरक अक्षतंतूतर्फे योग्य त्या अवयवाकडे, स्नायूकडे किंवा ग्रंथीकडे पाठविला जातो.
प्रेरक पेशीच्या अक्षतंतूकडून संवेद येण्याआधी मध्यवर्तीचेतासंस्थीमधील संवेद सहकारी चेतापेशीमध्ये नियंत्रित होतात. संवेदी आणि प्रेरक चेतापेशेमध्ये असलेल्या सहकारी चेतापेशी संवेद एका पेशीकडून नेमक्या पेशीकडे नेण्याचे कार्य करतात. नेमक्या कोणत्या प्रेरक चेतापेशीकेडे संवेद पोहोचवायचा याचा निर्णय मध्यवर्ती चेतासंस्थेमध्यी गुंतागुंतीच्या प्रक्रियेने घेतला जातो.
सर्वच संवेदी पेशींचे संवेद प्रेरक पेशीमध्ये येत नाहीत. काहीं संवेद मेंदूमध्ये ना येता मज्जारज्जूमध्ये संवेद परस्पर प्रेरक पेशीकडे पाठविला जातो. या प्रकारास प्रतिक्षेपी क्रिया म्हणतात. साध्या प्रतिक्षेपी क्रियेमध्ये एक संवेदी पेशी, एक किंवा अनेक सहकारी पेशीकडून प्रेरक चेतापेशीकडे संवेद येतात. थोडक्यात सर्व संवेद मेंदूकडून नियंत्रित होण्याऐवजी परस्पर मज्जारज्जूकडून ज्या क्रिया नियंत्रित होतात त्याला प्रतिक्षेपी क्रिया असे म्हणतात. पापण्यांची हालचाल, सायकल चालवणे, जेवताना बोलणे, हातवारे करणे या सर्व प्रतिक्षेपी क्रिया आहेत. या क्रिया करण्यासाठी मेंदूच्या सहभागाची फारशी गरज नसते. अर्थात सर्वच प्रतिक्षेपी क्रिया साध्या (सिंपल रिफ्लेक्स) नाहीत. अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्षेपी क्रियेमध्ये अनेक चेतापेशींचा संबंध असतो.
 
 
या क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता चेतारज्जूपर्यंतच पोहोचतात, आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. त्यांना [[प्रतिक्षिप्तप्रतिक्षेपी क्रिया]] असे म्हणतात.
 
{{विस्तार}}
१५५

संपादने