"ऑपरेशन चॅस्टाइझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
अखेर बार्नेस वॉलिस यांना कल्पना सुचली की जर एखादी गोलाकार वस्तू स्वतःभोवती गिरक्या घेत सरळ दिशेत पुरेशा वेगाने पाण्याच्या पृष्ठभागावर आदळली तर ती त्याच जागी लगेच पाण्यात न बुडता उलट उसळून पुढे जाईल. अशा प्रकारे काही टप्पे उसळ्या मारत पुढे गेल्यावर ती वस्तू बुडेल. याच तत्त्वाचा वापर करून त्यांनी उसळणारे बाँब बनवले. त्यासाठी पारंपरिक बाँबमध्ये व त्यांना नेणार्‍या विमानांत जरुरी बदल करण्यात आले.
===अपकिप===
यामोहिमे साठी वापरलेल्या बाँबला अपकिप (upkeep) सांकेतिक नाम देण्यात आले. अपकिप हा पारंपारिक बाँबच्या आकारात नव्हता. बाँबचा आकार बदलून त्यांना पिंपासारखे बनवण्यात आले. तसे केल्याने त्यांना फिरक्या देणे सोपे होईल, व पाण्याच्या पृष्ठभागाशी त्यांचा योग्य प्रकारे संपर्क होईल. अपकिप हा ६० [[इंच]] लांब होता व त्याचा व्यास ५० इंच होता. बाँबचे एकुण वजन ९,५०० [[पौंड]] होते व त्यात ६,६०० पौंड वजनाची शक्तिशाली स्फोटके वापरली होती. बाँब फेकण्यापूर्वी त्यांना फिरक्या देण्यासाठी विमानांत एक खास मोटरही बसवण्यात आली.
 
अपकिप बाँबला वाहुन नेण्यासाठी लँकेस्टर जातीचे विमान वापरण्यात आले. त्यांत मोटार लावण्यासटक इतरही बदल करण्यात आले. जसे अपकिपच्या अवाढव्य आकारामुळे विमानाचे बाँब टाकण्याच्या जागेचे दरवाजे काढण्यात आले. बाँब विमानाच्या खालच्या भागात लटकवले गेले. बाँब च्या जास्त वजनामुळे एका विमानाला एकच बाँब नेणे शक्य होते.
==पूर्वतयारी==
 
कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी [[इंग्लंड]]मध्ये याची तालीम घेण्यात आली. यासाठी एका नवीन [[स्क्वॉड्रन]]ची निर्मिती करण्यात आली. यात इंग्लंडसोबत त्यावेळील इंग्लंडच्या वसाहती असणारे [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यू झीलँड]] यांच्याही काही वैमानिकांचा समावेश होता. परिस्थितीची तपासणी करून ठरवण्यायात आले की धरणाच्या भिंतीपासून विशिष्ट अंतरावर पाण्यापासून केवळ ६० [[फूट]] उंचीवरून ३९० किमी प्रति तास या वेगाने बॉब टाकण्यात यावा. या तुकडीला सरावासाठी एक वापरात नसलेले धरणही उपलब्ध करून देण्यात आले. रात्रीच्या वातावरणात उड्डाण करण्याचा तसेच कमी उंचीवरुन उडण्याचा सराव करण्यात आला. वैमानिकांना एक अडचण होती. त्यावेळी वापरली जाणारी, हवेचा दाब मोजून जमिनीपासूनची उंची ठरवणारी उपकरणे barometric altimeters{{मराठी शब्द सुचवा}} फारशी अचूक नव्हती, त्यामुळे पाण्याच्या पातळीपासून ६० फूट उंच हे अंतर मोजणे अवघड होते. यावर एक उपाय योजला केला. विमानाच्या पुढच्या भागात (नाक)आणि मागील भागात खालील बाजूने असे २ दिवे लावण्यात आले त्यांचा झोत आतल्या बाजूस अशा कोनात वळवला गेला की पाण्यापासून ६० फूट उंचीवर असतांना दोन्ही दिव्यांचे प्रकाशझोत एकमेकात मिसळतील व पाण्यावर एकच झोत दिसेच. अखेर पुरेशा तयारीनंतर मे महिन्याचा मुहूर्त काढन्यात आला. कारण या दिवसात धरणांतील पाण्याची पातळी जास्त असते. त्यामुळेन जास्त पाण्याच्या प्रवाहाने मोठा पूर येऊन जास्त नुकसान व्हावे.
 
==मोहीम==
ओळ ४२:
[[चित्र:Bundesarchiv Bild 183-C0212-0043-012, Edertalsperre, Zerstörung.jpg|thumb|left|१७ मे १९४३ रोजी फुटलेल्या ईडर धरणाचे चित्र]]
[[चित्र:Eder dam.jpg|thumb|left|ईडर धरणाचे सध्याचे चित्र: धरणाच्या डावीकडे असलेल्या जागेत आताही दरवाजे नाहीत.]]
ईडर धरणाच्या सभोवतलचा भौगोलिक परिसर त्यातील विविध टेकड्यांमुळे विमानउडडाणासाठी फार अवघड होता. यातच धुकेही पडले होते. शेनॉनने पहिला प्रयत्न केला पण त्याला बाँब योग्य जागी टाकण्याजोगी विमानाची स्थिती बनवता आली नाही. त्याने एकुण ६ वेळा प्रयत्न केले. पण त्याला विमान योग्य जागी आणणे जमत नव्हते. अखेर त्याने काही वेळा पुरती विश्रांती घेतली. यानंतर मॉडस्लेने बाँब टाकण्याचा प्रयत्न केला पण त्याचा अंदाज चुकला व बाँब धरणाच्या भिंतीच्या वरच अडकुन फुटला. या स्फोटात स्वतः मॉडस्लेच्या विमानाचे फार नुकसान झाले. यानंतर शेनॉनने पुन्हा प्रयत्न केला व यावेळी मात्र यशस्वीरीत्या बाँब टाकला. अखेर बाँब नाईट याने टाकल्यावर ईडर धरणही फुटले.
 
 
===सोर्पे धरणावरील हल्ला===