"ऑपरेशन चॅस्टाइझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १५:
यामोहिमे साठी वापरलेल्या बाँबला अपकिप (upkeep) सांकेतिक नाम देण्यात आले. अपकिप हा पारंपारिक बाँबच्या आकारात नव्हता. बाँबचा आकार बदलून त्यांना पिंपासारखे बनवण्यात आले. तसे केल्याने त्यांना फिरक्या देणे सोपे होईल, व पाण्याच्या पृष्ठभागाशी त्यांचा योग्य प्रकारे संपर्क होईल. अपकिप हा ६० इंच लांब होता व त्याचा व्यास ५० इंच होता. बाँबचे एकुण वजन ९,५०० पौंड होते व त्यात ६,६०० पौंड वजनाची शक्तिशाली स्फोटके वापरली होती. बाँब फेकण्यापूर्वी त्यांना फिरक्या देण्यासाठी विमानांत एक खास मोटरही बसवण्यात आली.
 
अपकिप बाँबला वाहुन नेण्यासाठी लँकेस्टर जातीचे विमान वापरण्यात आले. त्यांत मोटार लावण्यासटक इतरही बदल करण्यात आले. जसे अपकिपच्या अवाढव्य आकारामुळे विमानाचे बाँब टाकण्याच्या जागेचे दरवाजे काढण्यात आले. बाँब विमानाच्या खालच्या भागात लटकवले गेले. बाँब च्या जास्त वजनामुळे एका विमानाला एकच बाँब नेणे शक्य होते.
==पूर्वतयारी==
 
ओळ ३२:
जर्मनीच्या विमानविरोधी गोळीबारापासून नजर चुकवण्यासाठी २ वेगवेगळ्या मार्गांनी विमाने गेली. अर्थात विमांनांच्या उड्डाणात अंतर ठेवूनही लक्ष्याजवळ सर्व विमाने योग्य वेळेतच पोहोचली. सर्वात पहिल्या विमानाने १६ मे च्या रात्री ९:२८ ला उड्डाण घेतले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विमाने निघाली. रडारच्या कक्षेत सापडण्यापासून वाचण्यासाठी विमाने अवघ्या १०० फूट उंचावरुन ( सुमारे ३० मीटर ) उडत होती. तरीही जर्मनांच्या तावडीतून ती वाचू शकली नाहीत. दुसर्‍या गटातील विमानांना सर्वात जास्त हानी झाली.
 
दुसर्‍या गटातील वैमानिक राईस विमानावर ताबा राखू शकला नाही. त्याचे विमान इतक्या खाली आले की जर्मनीत प्रवेश कराण्याआधीच ते समुद्राच्या पाण्यावर घासले गेले. त्यामुळे विमानातील बाँब तेथेच पाण्यात पडला. अखेर राईस विमानाला सांभाळत तळावर प‍रतला. मनरोचे विमानही गोळीबारात क्षतिग्रस्त झाले आणि तो ही तळावर परतला. यानंतर बायर्स आणि बारलो यांच्या विमांनाना तर जर्मनांनी पाडले. ती विमाने शत्रूच्या प्रदेशातच कोसळली. तर पहिल्या गटातील अ‍ॅस्टेल याचे विमान कमी उंचीवरुन उडण्यामुळे उच्च दाब वाहक विद्युत वाहक तारांमध्ये अडकून कोसळले.
 
===मॉहने धरणावरील हल्ला===
 
पहिल्या गटाने गिब्सनच्या नेतृत्वाखाली प्रथम मॉहने धरणावर हल्ला केला. पहिला बाँब गिब्सनने टाकला. त्यानंतर हॉपगुडने बाँब टाकायचा प्रयत्न केला. पण त्याच्या विमानाच्या पंखावर गोळ्यांच्या खूप जखमा झाल्या. विमान त्याच्या अपेक्षित उंचीपेक्षा इतके खाली आले की त्याच्या स्वतःच टाकलेल्या बाँबचा झटका बसला व पंख तुटून ते कोसळले. यानंतर तिसरा प्रयत्न मार्टिनने केला. यावेळी मार्टिनला गोळीबारापासून वाचवण्यासाठी गिब्सनने स्वतःचे विमान धरणाला समांतर उडवले. जेणेकरुन जर्मन तोफांचे लक्ष विचलित व्हावे. तरीही मार्टिनच्या विमानाला थोडी इजा झालीच. पण त्याने योग्य प्रकारे बाँब टाकला. त्यांनंतर यंगनेही बाँब टाकला आणि नंतर माल्टबीने. अखेर माल्टबीच्या बाँब नंतर धरण फुटले.
मॉहने धरण फुटल्यावर गिब्सन हा यंगला सोबत घेऊन इडर धरणाकडे वळला. तेथे त्याने डेव्ह शेनॉन, मॉडस्ले, लेस नाईट यांना सोबत घेऊन धरणावर हल्ला केला.
 
===ईडर धरणावरील हल्ला===
[[चित्र:Bundesarchiv Bild 183-C0212-0043-012, Edertalsperre, Zerstörung.jpg|thumb|left|१७ मे १९४३ रोजी फुटलेल्या ईडर धरणाचे चित्र]]
[[चित्र:Eder dam.jpg|thumb|left|ईडर धरणाचे सध्याचे चित्र: धरणाच्या डावीकडे असलेल्या जागेत आताही दरवाजे नाहीत.]]
 
 
===सोर्पे धरणावरील हल्ला===