Content deleted Content added
No edit summary
ओळ २७१:
==विचार करा==
:सागर, मला वाटते वगळलेल्या लेखात लेखाचे नाव सोडून काहिही मजकूर नाहि. असे लेख महिनोन महिने ठेवण्यात काही अर्थ नाही. अनेक लेखात पान काढा विनंत्याही लावलेल्या होत्या. बर्याच लेखांना speedy deletion request होत्या असे दिसते. मग हे लेख काढण्याअगोदर या सगळ्या विनंत्यांचा आपल्यासारख्या (म्हणजे विकिपिडीयाचे सर्व सदस्य) सदस्यांनी विचार करून ही पाने वाढवायला किंवा त्यात भर घालायला पाहिजे होती. आपल्या रागयुक्त संदेशातून असे जाणवते आहे की आपण ही पाने वाढवायच्या विचारात होता पण अजूनही काही बिघडलेले नाही या नावांनीच तुम्ही परत पाने तयार करू शकता फक्त पान मोकळे नको काय मजकूर पानाला जोडायचा आहे ते मनाशी आधी पक्के ठरवूनच पान बनवले म्हणजे ते मोकळे राहणार नाही व येथे फेरफटका मारणार्यांना निराशा होणार नाही (जी निराशा वगळलेल्या लेखांबाबतीत आजवर अनेकांची झाली असेल.) आपल्या योगदानाची विकिपिडीयाला गरज आहे. विचार कराल अशी अपेक्षा. [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] १७:५५, ८ ऑक्टोबर २०११ (UTC)
 
== जयंत साळगांवकर==
 
 
नमस्कार सागर सर,
मराठी शिकवणीचा खूप फायदा झाला! तुम्ही केलेल्या विनंतीला मन देवून मी '''जयंत साळगांवकर''' या पानावर जमेल इतकी माहिती पुरवण्याचे काम करण्यास तयार आहे. जयंत साळगांवकर पानाची लिंक मला मेल ने भेटली आहे लवकरात लवकर काम चालू करतो. राहुल सरांनी आणि तुम्ही कामाला सुरवात कशी करावी सांगितली ह्याबद्दल आभारी आहे. मला लिखाण करताना कुठे अडलेच तर मदत करावी..[[सदस्य:Bhimraopatil|Bhimraopatil]] १४:५१, १० ऑक्टोबर २०११ (UTC)