"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
बहुतेक चेतापेशी संवेद अक्षतंतूद्वारे पाठवतात. काहीं संवेद वृक्षिकेमार्फत पाठवले जातात. चेतापेशीपैकी अॅुमाक्रिन पेशीना अक्षतंतूऐवजी फक्त वृक्षिका प्रवर्ध असतात. चेता संवेद अक्षतंतूद्वारा विद्युत रासायनिक तरंगाच्या स्वरूपात पाठवला जातो. यास अॅ क्शन पोटेंशियल असे म्हणतात. अॅयक्शन पोटेंशियल अक्षतंतूच्या टोकापर्यंत जातो. अक्षतंतूची टोके दुस-या पेशीशी अनुबंधाने (सायनॅप्स) जोडलेली असतात. दोन पेशीपटलामध्ये सूक्ष्म संपर्क स्थान असते. संपर्कस्थानामधील दोन्ही पेशींच्या पटलामध्ये 2-20 नॅनोमीटर अंतर असते.
अनुबंध दोन प्रकारचे असतात. विद्युत आणि रासायनिक. दोन चेतापेशीमधील विद्युत अनुबंध प्रत्यक्ष चेतापेशीना जोडतात. सर्वसामान्यपणे सर्वाधिक अनुबंध रासायनिक आहेत. त्यांचामध्ये चांगलीच विविधता आहे. रासायनिक अनुबंधामध्ये दोन पेशी भाग घेतात. अनुबंधपूर्वपेशी आणि अनुबंधपश्चातपेशी. अनुबंधपूर्व पेशी आणि अनुबंधपश्चात पेशीमध्ये असलेली रसायने नवीन संवेद निर्माण करू शकतात किंवा आलेल्या संवेदाचे शमन (इन्हिबिशन) करू शकतात. आलेल्या संवेदाच्या निकडीवर हे अवलंबून असते. अनुबंध पूर्व पेशीच्या अक्षीय गुंडीमध्ये सूक्ष्म पुटिका असतात याना अनुबंध पुटिका म्हणतात. या पुटिकमध्ये चेताउद्भवी रसायने(न्यूरोट्रान्समिटर) असतात. अनुबंधपूर्व अक्षीय गुंडीमध्ये संवेद पोहोचला म्हणजे अक्षीय गुंडीमधील पुटिका चेताउद्भवी रसायने अनुबंधपूर्व आणि अनुबंधपश्चात पेशीमधील संपर्क स्थानामध्ये सोडतात. अनुबंध पश्चातपेशीपटलावर असणारे ग्राहक (रिसेप्टर) चेताउद्भवी रसायने ग्रहणकरतात. अनुबंधपश्चात पेशी उद्दीपित होते. आणि नवीन संवेद निर्माण होतो. ग्राहकाच्या प्रकाराप्रमाणे अनुबंध पश्चात पेशीचे उद्दीपन,शमन किंवा संस्करण होते. उदाहरणार्थ असिटल कोलिन हे चेताउद्भवी रसायन प्रेरक चेतापेशी अनुबंध आणि स्नायू संपर्क स्थानामध्ये आल्यास स्नायू त्वरित आकुंचन पावतो. अनुबंधातील पारगमन सेकंदाच्या दशलक्षाव्या भागात पूर्ण होते. अनुबंध पश्चात पेशीवरील परिणाम मात्र बराच काळ टिकून राहणारा असतो.
 
“ अनुबंध आणि अनुबंध कार्य”
चेतापेशी अक्षरश: शेकडो प्रकारच्या अनुबंधाने परस्पराशी जोडलेल्या असतात. त्यामध्ये शंभर एक प्रकारची चेताउद्भवी रसायने असतात. एकाहून अधिक प्रकार ग्राहकामध्ये असतात. अनेक अनुबंधामध्ये एकापेक्षा अधिक चेताउद्भवी रसायने असू शकतात. एका अशा प्रकारात एक चेताउद्भवी रसायन ग्लुटामेट किंवा जीएबीए (गॅमा अमिनो ब्युटारिक अॅ सिड) या वेगाने काम करणा-या रसायनाबरोबर एक बहुअमिनो आम्ली पेप्टाइड चेताउद्भवी सावकाश कार्य करणारे रसायन अशी दोन्ही रसायने अनुबंधात असतात. चेताउद्भवी रसायनामध्ये सर्वसाधारण दोन भाग करता येतात. पहिला आयन गवाक्ष परिवाही आणि दुसरा संदेशक. आयन गवाक्ष परिवाही चेताउद्भवी रसायनामुळे ठराविक प्रकारचे आयन पेशीपटलाच्या गवाक्षामधून पेशीमध्ये प्रवेशतात. आयनच्या प्रकारानुसार पेशी उद्दीपन किंवा शमन (एक्सायटेटरी आणि इन्हिबिटरी) होते . जेंव्हा संदेशक चेताउद्भवी रसायन परिणाम करते त्यावेळी अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्रिया होतात . या मुळे पेशीची संवेदनक्षमता कमी किंवा अधिक होते.
१५५

संपादने