"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,९८७ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
अनेक मृदुकाय प्राणी आणि कीटकामध्ये अभिनिर्धारित चेतापेशी शोधून काढलेल्या आहेत. पृष्ठवंशी प्राण्यातील मत्स्यवर्गातील चेतासंस्थेमध्ये माउथनर पेशी मस्तिष्क स्तंभाच्या (ब्रेन स्टेम) तळाशी असतात. प्रत्येक माशामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूस मेंदूमध्ये असलेल्या या पेशींचे अक्षतंतू परस्पर विरुद्ध येऊन मज्जारज्जू मधून जाताना अनेक चेताबंधाने जोडलेले असतात. माउथनर पेशींमुळे झालेले अनुबंध एवढे सक्षम असतात की त्यांच्या उद्दीपनामुळे माशाच्या वर्तनावर सेकंदाच्या दहाहजाराव्या भागाएवढ्या वेळेत परिणाम होतो. सरळ पुढे जाणारा माशाला नवीन आवाज ऐकू आला किंवा पाण्याच्या दाबामध्ये बदल जाणवला म्हणजे तो झपाट्याने इंग्रजी ‘ C’ आकारात वळतो. अडचणीच्या वेळी त्यातून सुरक्षित पळ काढण्यासाठी या पेशींचा उपयोग होतो. माशाच्या शरीराच्या दोन्ही बाजूस असलेल्या पार्श्वरेखेमधील (लॅटरल लाइन) संवेदी अवयवामुळे त्याला पाण्यातील दाबाचे ज्ञान होते. माउथनर पेशीमुळे अडचणीच्या वेळी जीव वाचविण्या शिवाय सतत सुरक्षित पोहणे आणि स्वजातीय समुदायाबरोबर राहण्यासाठी माशास मदत होते.
माउथनर पेशीला आज्ञा चेता (कमांड न्यूरॉन) असे म्हटले आहे. आज्ञा चेता माशाशिवाय नळ आणि म्हाकूळ या सारख्या मृदुकाय प्राण्यात आढळल्या आहेत. सागरामधील एक अजस्त्र नळाच्या ( स्क्विड) शुंडामध्ये या चेता साध्या डोळ्याने दिसतील एवढ्या मोठ्या आहेत.
 
 
चेतासंस्था कार्य
चेतासंस्थेचे मूळ कार्य संवेद एका चेतापेशीपासून दुस-या पेशीकडे पाठवणे. किंवा शरीराच्या एका भागाकडून दुस-या भागाकडे घेऊन जाणे. एका पेशीकडून दुस-या पेशीकडे संवेद घेऊन जाण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील एक पद्धत म्हणजे संप्रेरके . संप्रेरके हे रासायनिक संकेत आहेत. संप्रेरके रक्ताभिसरण संस्थेद्वारे संप्रेरक ज्या पेशीमध्ये किंवा ग्रंथीमध्ये त्या संप्रेरकाची ग्रहण यंत्रणा आहे अशाठिकाणी ग्रहण केल्या जातात. अशा रीतीने जेथून संप्रेरक बाहेर पडते त्यापासून दूरवरच्या ग्रंथीमध्ये कार्य करू शकते. हे थोडेसे रेडियो प्रक्षेपकासारखे कार्य करते. रेडियो स्टेशन रेडियो सिग्नल ब्रॉडकास्ट करते. आपल्या घरी असलेला रेडियो त्या तरंग लांबी ग्रहण करतो. याउलट चेतासंस्था नेमक्या एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी संकेत पाठवते. तुमच्या घरी असलेला टेलिफोन ज्याने तुमचा नंबर फिरवला त्याच्याशीच तुम्हाला बोलता येते. चेतासंस्थेमधील यंत्रणा अतिशय वेगाने संवेद पाठवण्याचेआणि ग्रहण करण्याचे कार्य करते. 100 मीटर प्रति सेकंद एवढ्या अधिकतम वेगाने चेतापेशीमधून संवेद पाठवला जातो.
अनेक चेतापेशी एकत्र आल्याने चेतासंस्थेचे प्रमुख कार्य शरीराचे नियंत्रण. परिसरातील बदलाची नोंद घेणे हे कार्य संवेदी इंद्रियाद्वारे होते. आणलेले संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे एकत्र होतात. या संवेदावर प्रक्रिया हो ऊन संवेदाचा नेमका प्रतिसाद प्रेरक संवेदामार्फत स्नायू किंवा ग्रंथीकडे पाठवला जातो. चेतासंस्था जशी प्रगत होत गेली तसे दृष्टि, सामाजिक परस्पर संबंध, शरीरातील अवयवांचे एकसूत्रीकरण होत गेले. मानवी चेतासंस्थेमध्ये भाषा, सामाजिक संदर्भ ,संकल्पना , या मानवी समुदायाच्या कल्पना मानवी मेंदूशिवाय सर्वस्वी अशक्य होत्या.
 
== प्रतिक्षिप्त क्रिया ==
१५५

संपादने