"ऑपरेशन ब्लू स्टार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १९:
 
==ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई==
[[File:Akal takhat amritsar.jpg|thumb|right|अकाल तख्त यातच जर्नेल सिंह व शाबेग सिंह सह प्रमुख दहशवादी तळ ठोकुन होते.]]
 
ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालिन मेजर जनरल कुलदीप सिंह बरार यांनी केले. सुवर्ण मंदिर व आजुबाजुच्या इमारती दहशतवाद्यांचे गढ बनल्या होत्या. जर्नेल सिंह स्वतः सुवर्ण मंदिरात अकाल तख्त या अतिशय महत्वाच्या भागात होते. त्यांचे सशस्त्र समर्थक व दहशतवादी दलांचे नेतृत्व शाबेग सिंह यांच्याकडे होते. (शाबेग सिंह हे पुर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते, १९७१ च्या युध्दात त्यांनी बांगलादेश मुक्तीबाहिनी च्या सभासदांना प्रशिक्षित केले होते. त्यांनी भा‍रतीय सैन्यात अतिविशिष्ठ सेवा पदक व परमविशिष्ठ सेवा पदक मिळाले होते.)
 
ओळ ३१:
 
यानंतर १० व्या बटालियनचे जवान त्यांच्या मदतीला देऊन पुन्हा हल्ला करण्यात आला. यावेळी जवानांनी पायर्‍यांजवळीन मशिन गन्स निकामी करण्यात यश मिळवले. यानंतर जवानांनी "परिक्रमा" भागात प्रवेश केला. पण आतील बाजुत दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार व ग्रेनेडचा हल्ला केला यामुळे जवानांना अकाल तख्त पर्यंत खोचता आले नाही. दहशतवाद्यांनी दरवाजे आणि खिडक्यांवर वाळुने भरलेली पोती लावली होती. यामुळे त्यांच्या वर सरळ गोळीबार करता येत नव्हता त्यातच अश्रुधुराप्रमाणे काम करणारे सन ग्रेनेड भारतीय सैनिकांनी फेकल्यावर ते उलटुन परत येत होते. सैनिकांनी यानंतर सुवर्ण मंदिराच्या दिशेने फार मारा होत असुन प्रत्युतरासाठी सुवर्ण मंदिराच्या दिशेने गोळीबार करण्याची परवानगी मागितली. पण सुवर्ण मंदिराच्या वास्तुला कसलेही नुकसान न करण्याचे निर्देश असल्याने जनरल बरार यांनी गोळीबाराची परवानगी दिली नाही. तेव्हा सैन्याच्या प्राणहानीच्या बातम्या सतत येत राहिल्या. सैनिक अकाल तख्तच्या जवळही जाऊ शकत नाहीत आणि प्राणहानीचा आकडाही वाढत होता तेव्हा एका चिलखती गाडी तुन जवानांना अकाल तख्तजवळ जाण्यासाठी पाठवन्यात आले. पण दहशतवाद्यांनी रॉकेट लाँचरने ती चिलखती गाडी उडवली. यानंतर जनरल बरार यांनी वरिष्ठांकडे रणगाड्यांचा वापर करण्याची प‍रवानगी मागितली व ती मिळाली. प्रथम रणगाड्यांच्या हॅलोजन दिव्यांच्या प्रकाशाने दहशतवाद्यांवर प्रखर प्रकाशझोत मारुन हल्ला करायचा प्रयत्न झाला पण तोही यशस्वी झाला नाही. अखेर रणगाड्यांतुन अकाल तख्त वर मारा करन्यात आला जो यशस्वी ठरला. यानंतर रात्री १ वाजेच्या (६ जुनच्या सकाळी) सुमारास काही जण पांढरे निशाण फडकवुन बाहेर आले तेव्हा सैन्याला कारवाई यशस्वी झाल्याचा अंदाज आला. नंतर अकाल तख्तमध्ये घुसुन जर्नेल सिंह व शाबेग सिंह यांची प्रेते मिळाली व त्यांची ओळख पटवण्यात आली. आजुबाजुच्या परिसरातील सर्व दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याची कारवाई आणखी काही तास सुरु राहिली.
 
==जिवितहानी==
भारत सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारी नुसार यात भारतीय सेनेचे ८३ जण मारले गेले. यात ४ अधिकारी , ४ कनिष्ठ अधिकारी व ७५ जवान होते. सुमारे २०० जण जखमी झाले. तर ४९२ दहशतवादी या कारवाईत मारले गेले. अनधिकृत आकडे यापेक्षा जास्त आहेत.