"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५७:
कीटकचेतासंस्थेतील मेंदूमध्येच्या बाह्य भागावर असलेल्या चेतापेशी विद्युत आवेग निर्माण करीत नाहीत. या मेंदूमधील अंतर्गत पेशीना पोषण पुरवण्याचे कार्य बाह्य पेशींचे असते. मेंदूच्या अंतर्गत चेतापेशीपासून अनेक अक्ष निघतात. या अक्षामुळे संवेद आणि विद्युत आवेग इतर चेतापेशीमध्ये पोहोचविले जातात. थोडक्यात कीटकांमधील मेंदूच्या बाह्य भागावरील चेतापेशी संवेद आणि आवेग ग्रहणाचे कार्य करीत नाहीत. मेंदूमधील चेतापेशीपासून निघालेले पेशीद्र्वाचे अक्ष आवेग आणि संवेद ग्रहण आणि वितरणाचे कार्य करतात. या पेशीद्रव अक्षाना ‘न्यूरोपिल’ असे म्हणतात.
 
 
 
“ अभिनिर्धारित चेतापेशी”
सजीवातील एखाद्या चेतापेशी चे कार्य पूर्णपणे इतर चेतापेशीपासून वेगळे असल्याचे आढळल्यास त्याला अभिनिर्धारित (आयडेंटिफाइड) चेतापेशी असे म्हणतात. हे त्या चेतापेशीचे वेगळेपण स्थान, चेतासंवेदी संप्रेरक, जनुक व्यक्तता पद्धत, इतर चेतापेशीशी वेगळ्या त-हेने जोडणी असे कशातही असू शकते. मानवी चेतासंस्थेमध्ये अशा अभिनिर्धारित पेशी अजून आढळल्या नाहीत. पण काही प्राण्यांच्या चेतासंस्थेमध्ये अशा सर्वच चेतापेशी अभिनिर्धारित असू शकतात. कीनो-हॅबडायटिस इलेगॅन्स या सूत्रकृमीमधील सर्वच चेतापेशी अभ्यासलेल्या आहेत. यातील प्रत्येक चेतापेशी अभिनिर्धारित आहे. प्रत्येक चेतापेशीमधील जनुकांची व्यक्तता सुद्धा वेगळी आहे. इतर प्राण्यामधील चेतापेशीमध्ये होणारा बाह्य स्थितुनुरूप बदल सीनो-हॅबडायटिसमध्ये होत नाही.
अनेक मृदुकाय प्राणी आणि कीटकामध्ये अभिनिर्धारित चेतापेशी शोधून काढलेल्या आहेत. पृष्ठवंशी प्राण्यातील मत्स्यवर्गातील चेतासंस्थेमध्ये माउथनर पेशी मस्तिष्क स्तंभाच्या (ब्रेन स्टेम) तळाशी असतात. प्रत्येक माशामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूस मेंदूमध्ये असलेल्या या पेशींचे अक्षतंतू परस्पर विरुद्ध येऊन मज्जारज्जू मधून जाताना अनेक चेताबंधाने जोडलेले असतात. माउथनर पेशींमुळे झालेले अनुबंध एवढे सक्षम असतात की त्यांच्या उद्दीपनामुळे माशाच्या वर्तनावर सेकंदाच्या दहाहजाराव्या भागाएवढ्या वेळेत परिणाम होतो. सरळ पुढे जाणारा माशाला नवीन आवाज ऐकू आला किंवा पाण्याच्या दाबामध्ये बदल जाणवला म्हणजे तो झपाट्याने इंग्रजी ‘ C’ आकारात वळतो. अडचणीच्या वेळी त्यातून सुरक्षित पळ काढण्यासाठी या पेशींचा उपयोग होतो. माशाच्या शरीराच्या दोन्ही बाजूस असलेल्या पार्श्वरेखेमधील (लॅटरल लाइन) संवेदी अवयवामुळे त्याला पाण्यातील दाबाचे ज्ञान होते. माउथनर पेशीमुळे अडचणीच्या वेळी जीव वाचविण्या शिवाय सतत सुरक्षित पोहणे आणि स्वजातीय समुदायाबरोबर राहण्यासाठी माशास मदत होते.
माउथनर पेशीला आज्ञा चेता (कमांड न्यूरॉन) असे म्हटले आहे. आज्ञा चेता माशाशिवाय नळ आणि म्हाकूळ या सारख्या मृदुकाय प्राण्यात आढळल्या आहेत. सागरामधील एक अजस्त्र नळाच्या ( स्क्विड) शुंडामध्ये या चेता साध्या डोळ्याने दिसतील एवढ्या मोठ्या आहेत.
 
== प्रतिक्षिप्त क्रिया ==