१०६
संपादने
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) छो |
|||
[[चित्र :Illustration Trigonella foenum-graecum0 clean.jpg|right|thumb|
'''मेथी'''(शास्त्रीय नावः ट्रिगोनेला फीनम-ग्रासम;) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. मेथी पाने व बिया (मेथीदाणे) या दोन्ही स्वरूपात वापरली जाते. मेथीची पाने व मोड आलेले मेथीदाणे हे भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.
[[en:Fenugreek]]▼
==उत्पादन==
[[नेपाळ]], [[भारत]], [[पाकिस्तान]], [[बांगलादेश]], [[अर्जेंटिना]], [[इजिप्त]], [[फ्रान्स]], [[स्पेन]], [[तुर्कस्तान]], [[मोरोक्को]] आणि [[चीन]] या देशांत मेथीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. भारतात [[राजस्थान]] राज्यात मेथीचे सर्वांत जास्त उत्पादन होते.
==वापर==
लोणची, रसभाज्यांसाठी वापरण्यात येणारे मसाले तसेच वाटणे यांमध्ये मुख्यतः मेथीदाण्याचा वापर केला जातो. मेथी ही एरिट्रीअन तसेच इथिओपियन जेवणातही वापरली जाते. [[इथिओपिया|इथिओपियामध्ये]] मेथीदाणे हे मधुमेहावरचे औषध म्हणून वापरले जातात. काही यहुदी लोक प्रथा म्हणून रोश हाशनाच्या (यहुदी नववर्ष) पहिल्या आणि दुसर्या रात्रीच्या जेवणात मेथीचा समावेश करतात. अंगावर पाजणार्या आयांना दूध यावे म्हणून मेथीदाण्यांचा वापर त्यांच्या जेवणात केला जातो.
{{विस्तार}}
▲[[en:Fenugreek]]
[[वर्ग:पालेभाज्या]]
|
संपादने