"ताडोबा राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३:
अलीकडेच याचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होउन त्याचे नाव [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प]] झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे.

आजमितीस(सप्टेंबर २०११) अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेतच, त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे [[वाघ|वाघांचे]] आकर्षणही वाढले आहे. आजच्या घडीला उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर [[बिबट्या]] , [[अस्वल]] , जंगली कुत्री अथवा [[कोळसून]] , [[तरस]] , [[उदमांजर]] आणि विविध प्रकारच्या [[रानमांजर | रानमांजरी]]. हरणांच्या जातीत, [[नीलगाय]] , [[सांबर]] , [[चितळ]] , [[भेकर]], कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी [[पिसुरी]] नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते

इथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाहता येतात. मच्छिमार, [[गरुड]], [[करकोचा|करकोचे]], [[बगळा|बगळे]], ससाणे, रानकोंबड्या, [[धनेश]], भृंगराज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, [[मोर]] हे त्यापैकी काही.

ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. [[साग]], [[बांबू]], ऐन, हलई, धावडा, बिबळा, [[तेंदू]], [[मोहा]], [[खैर]] अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते.<ref>आपली सृष्टी आपले धन भाग- ४ निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे
[[माझी मुलुखगिरी]], [[मिलिंद गुणाजी]]</ref>.
== हेही पाहा ==
* [[भारतातील राष्ट्रीय उद्याने]]