"१४ वे दलाई लामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lv:Tenzins Gjaco
छो Typo fixing using AWB
ओळ ३:
 
==कार्य==
त्यांचे आई-वडील [[शेतकरी]] होते. त्यांच्याकडे असलेल्या [[शेती]] व [[गाय|गाई]], [[म्हैस| म्हशींवर]] ते आपला उदरनिर्वाह चालवायचे. हे कुटुंब [[इ.स. १९३९]] मध्ये दलाई लामांच्या चौथ्या वाढदिवसानंतर आपलं छोटसं खेडेगाव सोडून [[ल्हासा]] येथे आले.
 
दलाई लामांच्या निवडीसाठी असलेल्या विविध कसोट्या यशस्वीरीत्या पार केल्यावर [[२२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४०]] रोजी [[पो ताला प्रासाद|पो ताला प्रासादात]] एका विधिपूर्व समारंभात ''तेंझिन गियात्सो'' विद्यमान चौदावे दलाई लामा म्हणून आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. पुढे त्यांचा धर्मविषयक सखोल अभ्यास सुरु असताना [[इ.स १९५०]] मध्ये [[चीन]]ने [[तिबेट]]वर आक्रमण केले. आणि हा प्रदेश चीनचा भाग असल्याचे घोषित केले. त्याचवेळी तिबेटच्या राजकीय सत्तेची सर्व सूत्रे दलाई लामांच्या हातात आली. या काळात तिबेटवर चिनी राजवटीचा अनियंत्रित अंमल सुरु झाला . धाक, दडपशाही, जुलूम, जबरदस्ती, छळवणूक, पिळवणूक इत्यादी अत्याचार तिबेट चरील जनतेवर चीनी राज्यकर्ते व लष्कराकडून होत होते. भगवान [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धाच्या]] शांतताप्रिय देशात हिंसाचार, लाठीमार अश्रुधूर व गोळीबार या अत्याचारांनी परिसीमा गाठली. जनतेच्या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्यावर र्निबध लादले गेले. तिबेटीय कला, संस्कृती व परंपरा यांचा ऱ्हास केला गेला. चीनच्या वाढत्या जाचामुळे व अत्याचारामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दलाई लामांना त्याच्या कुटुंबियांसह [[इ.स. १९५९]] मध्ये [[तिबेट]] सोडावे लागले. ते भारतात शरण आले. काही लोक [[नेपाळ]], [[भूतान]] व इतरत्र शरण गेले. [[जवाहरलाल नेहरू]] आणि लामा यांची [[इ.स. १९५९]] मध्ये [[मसूरी]] येथे भेट झाली. आज जगभरातील विविध देशांमध्ये तिबेटीय माणसे निर्वासितांचं आयुष्य कंठत आहे. त्यातील बहुतांश मात्र भारतात आहेत. [[हिमाचल प्रदेश|हिमाचल प्रदेशातील]] [[धरमशाला]]त दलाई लामा वास्तव्यास आहेत. येथे त्यांनी लोकशाही मूल्यांच्या तत्वावर तिबेटीय निर्वासितांची संसद स्थापन केली आहे. आज ही संसद किंवा निर्वासितांचे सरकार दलाई लामांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.
ओळ २३:
* [http://www.prahaar.in/collag/26587.html तिबेटींचा अमृतकुंभ] (मराठी मजकूर)
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2889797.cms कसोटी!] (मराठी मजकूर)
 
 
{{DEFAULTSORT:लामा,दलाई,१४}}