"कार्ले लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Typo fixing, replaced: हे ही पाहा → हेही पाहा using AWB
ओळ १:
'''कार्ले''' ही प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जाणारी ही लेणी आहेत. इसवी सनपूर्व पहिले शतक ते इसवीसन पाचवे शतक या काळात ही लेणी खोदली गेली.
 
== लेणी==
ओळ ८:
 
====कलात्मक अविष्कार====
चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. [[भारत|भारतात]] [[सम्राट अशोक|अशोकाने]] असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील [[सारनाथ]]च्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ पंचेचाळीस फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार, आणि अंग सोळा कोनांमध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार [[कळस]] दिसून येतो. त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. या स्तंभाचा करविता ‘महारठी अग्निमित्रणक याच्या दातृत्वाचा [[ब्राह्मी भाषा| भाषेतील]] लेख दिसतो.
 
चैत्यगृहाच्या उजव्या बाजूसही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावे असे अभ्यासकांना वाटते. याची एक सूचक शिल्पाकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आहे. इथे [[सिंह]] आणि [[चक्र]] असलेल्या खांबांमध्ये [[स्तूप]] दिसत आहे. याशिवाय या चैत्यगृहाचे [[कान्हेरी]]च्या चैत्यगृहाशी साम्य आहे असे मानले जाते कारण तिथेही असे दोन्ही स्तंभ दाखवलेले आहेत. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. येथे मिथुन शिल्पाच्या जोडय़ा, हत्तींचे थर, गौतम बुद्धाचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट, चैत्यकमानी आदि गोष्टी दिसून येतात. मिथुन शिल्पांतील स्त्रियांच्या डोक्यावर [[पदर]] घेतलेला दिसतो. तसेच कमरेला [[शेला]] आहे. पुरुषाने [[धोतर]] आणि डोक्यावर [[मुंडासे]] घातले आहे. स्त्रियांच्या हातात [[बांगडय़ा]] आहेत. तसेच पायातील विविध आकाराचे [[तोडे]], कमरेवरच्या [[मेखला]], गळ्यातील मण्यांचे हार, [[कर्णफुले]], कपाळावरची [[कुंकू]] अशी [[आभूषणे]] दिसून येतात. इथे असलेल्या या मिथुन जोडय़ा तत्कालीन राज्यकर्त्यांच्या किंवा या लेण्यास दान देणाऱ्यांच्या असाव्यात असाही एक तर्क आहे.
सज्ज्याच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रासादांचे देखावे आहेत. याच्या तळाशी दोन्ही बाजूला तीन हत्तींची शिल्पे कोरलेली आहेत. यातील डाव्या बाजूकडील हत्तींवर पुढे गौतम बुद्धाच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत.
[[चित्र:KarlaCaves.jpg | चैत्यगृह | thumb]]
चैत्यगृहाच्या सज्ज्यात या लेण्याच्या करवित्याचा लेख आहे. '''‘वेजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्ही उतमम्’''' वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्वीपात उत्कृष्ट आहे. असा याचा अर्थ होतो.
 
ओळ १९:
या लेखातून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रुढी-परंपरा, व्यापार-व्यवसाय, चलन असे अनेक विषय समजू शकतात. धेनुकाकट म्हणजे आजचे [[डहाणू]], सोपारक (आजचे सोपारा), करिजक (कार्ल्याच्या उत्तरेला असलेले करंजगाव) प्रभास म्हणजे आजच्या [[काठेवाड]] भागातील [[प्रभासतीर्थ]] वैजयंती म्हणजे आजचे [[कर्नाटक]]मधील [[उत्तर कन्नड]] जिल्ह्य़ातील बनवासी अशा अनेक गावांचे उल्लेख या लेखांतून दिसून येतात. चैत्यगृहाच्या व्हरांडय़ाच्या भिंतीवरील एका लेखात ‘मामालाहारे’ हा शब्द आलेला आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत एखाद्या ठरावीक गावांच्या प्रदेशास - प्रशासकीय भागास ‘आहार’ असे म्हणत. तर ‘मामल’ म्हणजे आजचे मावळ! मावळ तालुक्याचा हा सर्वात प्राचीन उल्लेख असावा. या लेखांमधून वढकी (सुतारकाम), गंधक (सुगंधी द्रव्याचा व्यापार) अशा काही व्यवसायांचीही ओळख होते.
 
==हे हीहेही पाहा==
 
*[[भाजे]]
ओळ २५:
*[[पांडवलेणी]]
*[[भारतीय शिल्पकला]]
*[[ महाराष्ट्रातील लेण्यांची सूची]]
{{विस्तार}}
{{साचा:महाराष्ट्रातील प्राचीन लेणी}}
 
[[वर्ग:शिल्पकला]]
[[वर्ग:लेणी]]