"वैमानिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fy:List fan loftfeartpioniers
छो Typo fixing, replaced: हे ही पाहा → हेही पाहा using AWB
ओळ १:
विमान चालकाला '''वैमानिक''' असे म्हणतात. वैमानिक हा विमानाचा कप्तान असतो. प्रवाशांचा हवाई प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा हे वैमानिकाचे प्रथम कर्तव्य असते. धोक्याची परिस्थिती उद्भवल्यावर ती हाताळणे हे वैमानिकाच्या कौशल्यावर अवलंबून असते. हे असे नैपुण्य त्याला प्रशिक्षणातून आणि अनुभवातून मिळवावे लागते.
[[लढाऊ वैमानिक|लढाऊ वैमानिकांना]] वेगळे प्रशिक्षण दिलेले असते. भारतीय हवाई दलातील [[महाराष्ट्र]] राज्यातील पहिली महिला वैमानिक भूपाली वडके ही आहे.
[[चित्र:Lt Mike Hunter 1.jpg|अमेरिकेच्या हवाई दलाचा एक वैमानिक|right|thumb|]]
==प्रशिक्षण==
वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा दर्जा उच्च असतो. त्यात नेमकेपणा आणि शिस्त असते. वैमानिक होण्यासाठी तंत्रज्ञानाचे उत्तम प्रशिक्षण दिले जाते.
वैमानिकाच्या प्रशिक्षणामध्ये [[हवाई वाहतूक नियंत्रण ]], [[हवामानशास्त्र]], [[रेडिओ ]], नॅव्हिगेशन, विविध यंत्रांची देखभाल यांचा अंतर्भाव असतो.
वैमानिकांचे प्राविण्य आणि नैपुण्य सूक्ष्म दृष्टिने तपासून मगच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. वैमानिक प्रशिक्षण हे वेगवेगळ्या विमानांसाठी निरनिराळे असते.
ऐनवेळी एखादा भाग अथवा इंजिने बंद पडल्यास किंवा निकामी झाल्यास, आणीबाणीच्या परिस्थितीला शांतपणे सामोरं जाऊन योग्य निर्णय घेणे, सातत्याने जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे योग्य पालन करणे, हे प्रशिक्षण वैमानिकाला दिले जाते.
ओळ १७:
वैमानिकांची शारीरिक तपासणीही होते. [[मद्य|मद्याचा]] अंमल अथवा हँगओव्हर असेल तर त्याला त्या दिवसाचे काम मिळत नाही. असे काम केल्यास त्यावर कारवाई होते.
 
==हे हीहेही पाहा==
==बाह्य दुवे==
* [www.dgca.nic.in डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन यांचे संकेतस्थळ] (इंग्रजी)
"https://mr.wikipedia.org/wiki/वैमानिक" पासून हुडकले