"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: yi:נערוון סיסטעם; cosmetic changes
ओळ १:
[[चित्र:Nervous_system_diagram.png|thumb|चेतासंस्था]]
'''चेतासंस्था''' ही [[प्राणी|प्राण्यांच्या]] [[शरीर|शरीरातील]] [[स्नायू|स्नायूंच्या]] तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,[[ज्ञानेद्रिय|ज्ञानेंद्रियांना]] संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे. ही संस्था [[चेतापेशी]] आणि [[चेतातंतू]] यांची बनलेली असते.
 
== वर्गीकरण ==
=== चेतासंस्था ===
हा वैशिष्ठ्यपूर्ण चेतापेशींचा समूह . चेतापेशीच्या सहाय्याने शरीरातील क्रियाची व्यवस्थित जुळणी होते. शरीरातील सर्व भागाकडे आवश्यक संवेद पाठविणे आणि ज्ञानेंद्रियाकडून आलेले संवेद ग्रहण करणे हे चेतासंस्थेचे कार्य आहे. बहुतेक सर्व प्राण्यामध्ये चेतासंस्थेचे दोन भाग असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघवर्ती चेतासंस्था. मानवासारख्या कशेरुकी- पृष्ठवंशी प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू, मेरुरज्जू, आणि नेत्रपटल (रेटिना) यांचा समावेश आहे. परिघवर्ती मज्जासंस्थेमध्ये संवेदी चेतापेशी, गुच्छिका (चेतापेशींचा समूह ) आणि चेता , यांचा समावेश असतो. मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्था परस्परांशी जटिल चेतामार्गाने जोडलेले असतात. चेतापेशींचा आणखी एक भाग अनुकंपी चेता तंत्र (सिंपथॅटिक नर्व्हस सिस्टीम) उदर पोकळीताल अवयवांचे नियंत्रण मस्तिष्क चेता मधील प्राणेशा चेताद्वारे (व्हेगस) स्वतंत्रपणे करते.
 
चेतापेशी इतर चेता पेशीना विद्युत रासायनिक पद्धतीने संदेश पाठवितात. हे संदेश चेतापेशीच्या अक्षतंतूमधून प्रवास करतात. अक्षतंतूच्या टोकास अक्षीय गुंडी नावाचा फुगीर भाग असतो. असतो दोन चेतापेशी अनुबंधामधून संपर्कात येतात. अनुबंधामध्ये आलेल्या आवेगामुळे चेतापेशी उद्दीपित, अवरोध किंवा संस्करित होतात. संवेदी चेतापेशी प्रत्यक्ष संदेश मिळाल्यानंतर उद्दीपित होतात. संवेदी चेतापेशी मध्यवर्ती चेता संस्थेकडे किंवा स्नायूकडे संदेश पाठवतात. बहुघा हे संदेश शरीराच्या ज्ञानेंद्रियाकडून किंवा बाह्य शरीरबाह्य बदलाशी संबंधित असतात. प्रेरक चेतापेशी मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये आणि गुच्छिकेमध्ये असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि स्नायू किंवा एखाद्या कार्य करणा-या, अवयवास अगर ग्रंथीस प्रेरक चेतापेशी जोडलेल्या असतात. चेतापेशीच्या आणखी एका प्रकारास सहयोगी चेतापेशी असे म्हणतात. पृष्ठवंशी (कशेरुकी) प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतापेशींची संख्या सर्वाधिक असते. मध्यवर्ती चेतापेशी कडे सर्व संवेदी,प्रेरक आणि सहयोगी चेतापेशींचे बंध असतात. या सर्वपेशींच्या परस्पर मेळामुळे बाह्य परिसरातील स्थितीचे ज्ञान प्राण्यास होते.प्राण्याचे वर्तन ज्ञानावर आधारित असते. चेतापेशीशिवाय मज्जासंस्थेमध्ये सहयोगी पेशी (ग्लायल पेशी) असतात. चेतापेशीना आधार देणे आणि चेतापेशीच्या चयापचय गरजा पूर्ण करणे हे सहयोगी पेशींचे कार्य आहे
 
बहुतेक सर्व बहुपेशीय प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. पण त्यांच्या रचनेमध्ये बरीच विविधता आढळते . स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्था नाही. पण स्पंज वर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्थेशी समजात (होमोलॉग) असणा-या जनुकामुळे चेतासंस्थेशी संबंधित कार्याचा उगम आढळतो. अगदी प्राथमिक स्वरूपाची शारिरिक हालचाल नियंत्रित करणे स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये दिसते. जेलिफिश सारख्या आंतरगुही संघातील अरीय सममित प्राण्यामध्ये चेतासंस्था प्राथमिक चेतापेशींच्या जाळ्याच्या स्वरूपात असते. बहुपेशीय द्विपार्श्वसममित प्राण्यामध्ये पृष्ठवंशी (कशेरुकी ) आणि अपृष्ठवंशी (अकेशेरुकी) प्राण्यांचा समावेश होतो. या सर्वप्राण्यामधील चेतासंस्था एक मध्यवर्ती रज्जू (किंवा दोन समांतर रज्जुका) आणि परिघवर्ती चेता या स्वरूपात असते. द्विपार्श्वसममित सूत्रकृमीसारख्या प्राण्यामधील चेतापेशीं काही शेकड्यापासून मानवी चेतासंस्थेतील पेशींची संख्या शंभर अब्जापर्यंत पोहोचली आहे. चेताशास्त्र म्हणजे चेतासंस्थेचा अभ्यास.
 
== रचना ==
ओळ ३०:
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:मानवी शरीर]]
[[वर्ग:चेतासंस्था| ]]
Line १०६ ⟶ १०७:
[[vi:Hệ thần kinh]]
[[war:Sistema nerbyos]]
[[yi:נערוועןנערוון סיסטעם]]
[[zh:神经系统]]
[[zh-min-nan:Sîn-keng hē-thóng]]