"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५:
 
 
 
 
 
रचना:
चेता संस्था या नावाचा उगम चेता पासून आहे. चेता म्हणजे दंडगोलाकार तंतूंचा जुडगा. हा जुडगा मेंदू आणि मज्जा रज्जूमधील दुवा आहे. चेता विभाजित होऊन शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचते. इजिप्शियन, ग्रीक, आणि रोमन संशोधकानी चेता प्रत्यक्ष पाहिलेल्या होत्या. त्यातील सूक्ष्म रचना त्याना ठावूक नव्हती. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर चेता अनेक तंतूनी बनलेली असते हे समजले. हे तंतू चेतापेशींच्या अक्षतंतूंचे होते. अक्षतंतूभोवती गुंडललेली पटले आणि पटलामध्ये अधून मधून खंड (फॅसिकल) असतात हे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत असे. अक्षतंतूंचा उगम पेशी पासून होतो. पण बहुतांश पेशी मेंदू, मज्जारज्जू आणि गुच्छिके मध्ये स्थित आहेत.
स्पंज संघातील प्राण्याहून प्रगत अशा सर्व प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. स्पंज संघातील प्राणी आणि स्लाइम मोल्ड सारख्या प्राणि सृष्टीबाहेरील सजीवामध्ये सुद्धा पेशी पेशी मध्ये संपर्क यंत्रणा आहे. चेतापेशीपूर्व अशा या यंत्रणेपासून चेतापेशी विकसित झाल्या. जेलिफिश आणि हायड्रा (जलव्याल) सारख्या अरीय सममित प्राण्यामध्ये चेतापेशींचे विस्कळित जाळे आहे. बहुसंख्येने सध्या आस्तित्वात असले;ल्या सर्व द्विपार्श्वसममित प्राण्यामध्ये उत्क्रांत झालेली चेतासंस्था कॅंब्रियन कालखंडापासून पाचशे दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झाली.
 
चेतासंस्था चेतापेशी आणि सहयोगी अशा दोन प्रकारच्या पेशीनी बनलेली असते.
चेतासंस्था म्हणजे चेतापेशी ज्या संस्थेमध्ये आहेत अशी संस्था. चेतापेशी इतर पेशीपासून सहज ओळखता येतात. चेतापेशी परस्पराशी अनुबंधाद्वारे जोडलेल्या असतात. चेतापेशीमधील अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुस-या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशीना एक किंवा अनेक प्रवर्ध (पेशीपासून निघालेला लांब भाग) निघतात . सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेला असतो. अक्षतंतू प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेले असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन चेता (नर्व्ह) च्या स्वरूपात शरीरभर स्नायू किंवा अवयवापर्यंत गेलेली असते.
मानवी चेतासंस्थेमध्ये शेकडो प्रकारच्या चेतापेशी असतात. प्रत्येक पेशीची रचना आणि कार्यामध्ये विविधता आहे. यामधील संवेदी चेतापेशी प्रकाश, ध्वनि संवेद ग्रहण करतात. प्रेरकचेतापेशी स्नायू आणि ग्रंथीना संवेदाद्वारे उत्तेजित करतात. ब-याच प्राण्यामध्ये बहुतेक संवेदी चेतापेशी संवेद ग्रहण करून ते संवेद इतर चेतापेशीकडे पाठवतात.
 
 
 
== प्रतिक्षिप्त क्रिया ==
 
 
 
या क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता चेतारज्जूपर्यंतच पोहोचतात, आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. त्यांना [[प्रतिक्षिप्त क्रिया]] असे म्हणतात.