"व्हायोलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: rue:Гуслї
(चर्चा | योगदान)
ओळ ११:
भारतीय वाद्यसंगीत परंपरेत तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार तंतुवाद्याचे तारा छेडून वाजवावयाची वाद्ये व गजाने वाजवावयाची वाद्ये, असे दोन प्रकार अस्तित्त्वात आहेत. भारतामध्ये व्हायोलिनची प्राचीन जातकुळी सांगणारी वीणाकुंजू, पुल्सुवन, केंदू, पेना, बेनाम, किन्नरी, रावणहट्टा ही तंतुवाद्ये आहेत, असे मानले जाते. व्हायोलिन हे वाद्य भारतीय नाही. जरी ते परकीय असले, तरी आज देशामध्ये मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले ते वाद्य आहे. वरील वाद्ये व्हायोलिनप्रमाणेच उलटी धरुन गजाने वाजविली जातात. या वाद्यांचा वापर अभिजात शास्त्रीय संगीतात आढळत नाही. त्यांचा विशेष वापर लोकसंगीतात होत होता.
== इतिहास ==
व्हायोलिनच्या इतिहासावर नजर टाकली तर या वाद्याचा प्रवास आणि त्याचे बुजूर्गपणबुजुर्गपण ध्यानात येते. आजच्या व्हायोलिन वाद्याशी मिळते-जुळते पहिले चित्र ९ व्या शतकात आढळते. तेराव्या शतकात युरोपमध्ये प्रचारात आलेले 'व्हिएसे' हे वाद्य व्हायोलिन वाद्याच्या आजच्या स्वरुपाचे जनक मानले जाते. कारण पुढील दोनशे ते अडीचशे वर्षांच्या कालखंडात अनेक प्रकारचे आकार घेत, १७ व्या शतकात आजचे व्हायोलिन युरोपात नावारुपाला आले. या वाद्याला 'फीडलफिडल' हेही नाव त्यावेळी प्रचारात होते. आजही व्हायोलिनला फीडलफिडल म्हणून संबोधले जाते. भारतात या वाद्याला 'बेला' असेही म्हणतात.
 
युरोपपासून भारतापर्यंतचा प्रवास करण्यास व्हायोलिनला फारसा काळ लागला नाही. पाश्चात्यपाश्चात्त्य लोकांमुळेच त्याचा आपल्या देशात प्रसार आणि प्रचार झाला. या वाद्याचा भारतीय संगीतात पहिला प्रवेश दक्षिण भारतातील संगीतामधून झाला. त्यानंतर कर्नाटक संगीतातील वासूस्वामी दीक्षितार, मुत्तुस्वामींचे शिष्य वडिवेसू यांनी त्याचा वापर केला. आज दक्षिण भारतातील कोणताही संगीत प्रकार व्हायोलिनच्या साथसंगतीशिवाय सादर होऊ शकत नाही. महाराष्ट्रात व्हायोलिनला स्वतंत्र स्थान मिळवून देण्याचे श्रेय कै. पंडित गजाननबुवा जोशी यांना जाते. त्यानंतर पंडित व्ही. जी. जोग, श्रीमती डॉ. एम. राजम, एम. एस. गोपालकृष्णन, लालगुडी जयरामन इत्यादी श्रेष्ठ व्हायोलिन वादकांनी आपल्या वादनाची एक खास शैली निर्माण केली आहे.
 
युरोपपासून भारतापर्यंतचा प्रवास करण्यास व्हायोलिनला फारसा काळ लागला नाही. पाश्चात्य लोकांमुळेच त्याचा आपल्या देशात प्रसार आणि प्रचार झाला. या वाद्याचा भारतीय संगीतात पहिला प्रवेश दक्षिण भारतातील संगीतामधून झाला. त्यानंतर कर्नाटक संगीतातील वासूस्वामी दीक्षितार, मुत्तुस्वामींचे शिष्य वडिवेसू यांनी त्याचा वापर केला. आज दक्षिण भारतातील कोणताही संगीत प्रकार व्हायोलिनच्या साथसंगतीशिवाय सादर होऊ शकत नाही. महाराष्ट्रात व्हायोलिनला स्वतंत्र स्थान मिळवून देण्याचे श्रेय कै. पंडित गजाननबुवा जोशी यांना जाते. त्यानंतर पंडित व्ही. जी. जोग, श्रीमती डॉ. एम. राजम, एम. एस. गोपालकृष्णन, लालगुडी जयरामन इत्यादी श्रेष्ठ व्हायोलिन वादकांनी आपल्या वादनाची एक खास शैली निर्माण केली आहे.
== कसे वाजवितात ==
सारंगी, व्हायोलिन, सनई, बासरी ही वाद्ये गायकी अंगाने वाजविली जातात. गायक गळ्याने गातो, तर वादक बोटाने गातो. गायकाच्या कंठाला (गळ्याला) जे शक्य नाही ते बर्‍याचवेळा वादकाच्या बोटाला शक्य असते. म्हणूनच गायनशैली व वादनशैली यात फरक पडतो. आज व्हायोलिन वादनाच्या मैफलीची एक खास शैली बनू पाहत आहे. रागांची शास्त्रशुध्द मांडणी, ताल-लय यांचा क्रमबध्द विकास, याबरोबरच गजकामाच्या कसरती, फिगरिंग बोर्डचा अवांतर वापर, तबल्याबरोबरचे सवाल-जवाब, भन्नाट लयीत पोहोचणारा 'झाल्या'सारखा प्रकार, या सर्व आतषबाजींकडे व्हायोलिनवादनाची मैफल झुकू लागली आहे. भारतातील श्रेष्ठ वादक-कलाकार पंडित व्ही. जी. जोग, उस्ताद बिस्मिल्ला खॉं, पंडित सामता प्रसाद या त्रिकुटाने व्हायोलिन-सनई-तबला या वाद्यांच्या जुगलबंदीने अफाट लोकप्रियता मिळवली होती.