"जॉर्ज फर्नांडिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ६:
 
==राजकीय कारकीर्द==
जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम [[इ.स. १९६७]] मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते [[स.का.पाटिल]] यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र [[इ.स. १९७१]] च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी [[इ.स. १९७४]] मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. [[इ.स. १९७७]] साली [[मोरारजी देसाई]] यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी [[उद्योगमंत्री]] म्हणून काम बघितले. जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते [[यशवंतराव चव्हाण]] यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहीर करून मंत्रीमंडळातून राजीनामा दिला.
[[इ.स. १९८४]] च्या निवडणुकीत त्यांचा [[मंगलोर]] लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.पण [[इ.स. १९८९]] मध्ये ते [[बिहार]] राज्यातील [[मुझफ्फरपूर]] लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून गेले.[[विश्वनाथ प्रताप सिंह]] यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या [[संयुक्त आघाडी]] सरकारमध्ये ते [[रेल्वेमंत्री]] होते. [[इ.स. १९९१]] च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी [[मुझफ्फरपूर]] लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.
 
[[इ.स. १९९४]] मध्ये [[बिहार]] राज्याचे मुख्यमंत्री [[लालू प्रसाद यादव]] यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या [[नितीश कुमार]] आणि [[रवी रे]] यांच्यासारख्या नेत्यांनी [[समता पक्ष]] या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.[[इ.स. १९९६]] च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील [[नालंदा]] मतदारसंघातून विजय मिळवला.पुढे [[इ.स. १९९८]] आणि [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकींत त्यांनी [[नालंदा]] मतदारसंघातूनच विजय मिळवला. [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी [[समता पक्ष]] आणि [[रामकृष्ण हेगडे]] यांचा [[लोकशक्ती]] या पक्षांचे विलीनीकरण होऊन [[जनता दल (संयुक्त)]] हा नवा पक्ष अस्तित्वात आला.
 
[[इ.स. १९९८]] मध्ये [[अटलबिहारी वाजपेयी]] यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी [[संरक्षणमंत्री]] म्हणून काम बघितले. [[इ.स. २००१]] मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर २००१ मंत्रिमंडळाबाहेर होते.पण ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली.
 
[[इ.स. २००४]] च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी [[बिहार]] राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या [[मुझफ्फरपूर]] मतदारसंघातून विजय मिळवला. नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रीय राहिले नाहीत.त्यांना [[इ.स. २००९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[जनता दल (संयुक्त)]] पक्षाने तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षनेतृत्वाबरोबरचे त्यांचे मतभेद मिटले आणि ते राज्यसभेत पक्षातर्फे बिहारमधून निवडून गेले आहेत.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
[[वर्ग: जनता दल (संयुक्त) पक्षाचे नेते]]
[[वर्ग: भारतीय उद्योगमंत्री]]
[[वर्ग: भारतीय रेल्वेमंत्री]]
[[वर्ग: भारतीय संरक्षणमंत्री]]
[[वर्ग: ४ थी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ६ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ७ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ९ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १० वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ११ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १२ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १३ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १४ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: दक्षिण मुंबईचे खासदार]]
[[वर्ग: मुझफ्फरपूरचे खासदार]]
[[वर्ग: नालंदाचे खासदार]]
[[वर्ग: इ.स. १९३० मधील जन्म]]
 
[[en:George Fernandes]]