"ऑपरेशन ब्लू स्टार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
 
==पंजाबातील घडामोडी==
१९६६ मध्ये शीख बहुल असणारा पंजाब राज्य रचना झाली. पण त्यानंतरही पंजाबच्या राजकारणात पकड कायम ठेवण्यासाठी अकाली दलाकडुन आक्रमक राजकारण चालु राहिले. चंडिगड पंजाब मधील सामिल करावे. पंजाबमधुन जाणार्‍या नद्यांवरील पाणी हरियाणा व राजस्थान ला देणे यावरुनही विवाद होता. हळुह़ळु याचे रुपांतरण फुटीरतावादी चळवळीत झाले. पंजाबच्या राजकारणात फुट पाडण्यासाठी काँग्रेस ने जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना छुपा पाठिंबा दिला. याची कबुली काँग्रेसने २०११ साली आपल्या पक्षाचा जो अधि़कृत इतिहास प्रकाशित केला त्यात दिली. पण त्याची जबाबदारी ही दिवंगत नेते व इंदिरा गांधींचे जेष्ठ पुत्र संजय गांधी यांच्यावर टाकली. १९७३ मध्ये आनंदपुर साहिब मध्ये एक ठराव पास करण्यात आला.
 
१९७३ मध्ये आनंदपुर साहिब मध्ये एक ठराव पास करण्यात आला. याठरावानुसार केंद्र सरकारने केवळ विदेश, संरक्षण व मुद्रा अशी पाच खाती सांभाळावीत आणि इतर अधिकार पंजाबला देत स्वायत्तता द्यावी अशी मागणी करण्यात आली.मार्च १९८१ मध्ये स्वायत्त खलिस्तानचा झेंडा आनंदपुर साहिब वर फडकवण्यात आला. दरम्यान जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांनी जहाल भाषणे देण्यास सुरवात केली.दमदमी टकसालच्या प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली. जहालमतवादी लोकांचा त्यांना पाठिंबा मिळु लागला व आपल्या मागण्यांसाठी सशस्त्र मार्ग त्यांनी निवडला. दमदमी टकसाल आणि निरंकारी पंथाचे शीख यांत एप्रिल १९७७ मध्ये संघर्ष झाला यात १३ शीख मारले गेले. पुढे १९८० च्या एप्रिल महिन्यात निरंकारी पंथाचे प्रमुख गुरबचन सिंह यांची हत्या करण्यात आली. मग सप्टेंबर १९८१ मध्ये हिंद समाचार समूहाचे प्रमुख जगत नारायण यांची हत्या झाली व याआरोपावरुन जर्नेल सिंह यांना अटक करण्यात आली. अकाली दलाने जर्नेल सिंहच्या सुटके साठी केंद्र सरकार बरोबर चर्चा केली. पण गजिंदर सिंह आणि सतनाम सिंह यांनी श्रीनगरहुन दिल्लीला येणारे इंडियन एयरलाइंस च्या विमानाचे अपहरण करुन लाहोरला (पाकिस्तान)नेले व जर्नेल सिंह यांच्या सुटकेची मागणी केली. अखेर पुढच्याच महिन्यात ऑक्टोंबर १९८१ मध्ये जर्नेल सिंह यांना सोडण्यात आले. एप्रिल १९८२ मध्ये अकाली दलाने यमुना-सतलज योजनेला जोरदार विरोध केला.
 
यानंतर पंजाबातील परिस्थिती आणखी बिघडली.
*१९८२ च्या ऑगस्ट मध्ये अकाली दल ने धर्म युद्ध मोर्चाची घोषणा केली. याच महिन्यात दिल्ली हुन श्रीनगर जाणारे इंडियन एअरलाइंसचे विमान अपहरण करुन पुन्हा लाहोरला नेण्यात आले. पण पाकिस्तान कडुन विमान उतरवण्यास परवानगी नाकारली. तेव्हा ते पुन्हा अमृतसरला ( पंजाब )परतले व अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली. यानंतर मुसीबत सिंहने इंडियन एअरलाइंसचे जोधपुरमार्गे मुंबई हुन दिल्ली येणारे विमानाचे अपहरण केले. याखेपेलाही पाकिस्तानने लाहोरला विमान उतरवण्यास परवानगी नाकारली. अखेर अमृतसर विमानतळावर कमांडो कार्रवाई करण्यात आली. यात अपहरणकर्ता मुसीबत सिंह ठार झाला.
*१९८३ च्या एप्रिल मध्ये पंजाब पोलिसचे डीआईजी अवतार सिंह अटवाल यांची सुवर्ण मंदिरच्या परिसरात पाहणी साठी गेले असतांना सुवर्ण मंदिरच्या समोरचा हत्या झाली. यावेळी तेथे साधारण १०० पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
*जुन ते ऑगस्ट दरम्यान अकाली दलाने मोठ्या प्रमा़णात रेल रोको व बंद करण्यात आले. अखेर ऑक्टोंबर १९८३ साली कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरुन पंजाबच्या कांग्रेस सरकारच्या बरखास्तीची केंद्र सरकारने घोषणा करुन राज्यात राष्ट्रपती शासन लागू केले.
*डिसेंबर १९८३ मध्ये जर्नेल सिंह यांनी सुवर्ण मंदिरातील अकाल तख़्त साहिब मध्ये आश्रय घेतला.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
==ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई==
==कारवाईचे परिणाम==