"एलईडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १८:
[[File:LED Labelled.svg|thumb|300px|right|एल्‌ईडीचे विविध भाग]]
[[File:PnJunction-LED-E.svg|thumb|300px|right|एल्‌ईडीच्या अंतर्भागातले कार्य]]
एल्ईडी बनवतांना निर्माण होणार्‍या प्रकाशाचे रंग हे त्याच्या [[तरंगलांबी]]वर अवलंबून असतात. तेव्हा अपेक्षित तरंगलांबीचे फोटॉन मिळवण्यासाठी 'पी' आणि 'एन' भागातल्या अर्धवाहक पदार्थाच्या इलेक्ट्रॉनांच्या पातळ्यांत आवश्यक तो फरक असावा लागतो. त्यानुसार वेगवेगळे अर्धवाहक पदार्थ निवडावे लागतात. जर एल्ईडी हवेत मोकळा ठेवला व त्यास विद्युत पुरवठा केला, तर त्यातून प्रकाश मिळू शकणार नाही. प्रकाशाचा [[वक्रीभवनांक]]<ref>पारदर्शक पदार्थाचा वक्रीभवनांक=प्रकाशाचा निर्वात प्रदेशातील वेग भागिले प्रकाशाचा त्या पारदर्शक पदार्थामधून जाण्याचा वेग. हवेचा वक्रीभवनांक जवळजवळ १ आहे, म्हणजे प्रकाशाचा हवेतील वेग आणि निर्वातातील वेग जवळजवळ सारखा आहे. क्वार्ट्‌झसारख्या सेमीकंडक्टरांमधून प्रकाश हळू जात असल्याने त्याचा वक्रीभवनांक सुमारे ४ आहे</ref>, अर्थात रिफ्रॅक्टिव इंडेक्स हा गुणधर्म यास कारणीभूत ठरतो. जेव्हा [[प्रकाश]] एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात प्रवेश करतो, तेव्हा तो काही कोनात आपला मार्ग बदलतो. दोन माध्यमांच्यामाध्यमांतील प्रकाशवहनाच्या वेगांतील फरक जेवढा मोठा, तेवढा प्रकाशाचा मार्ग बदलण्याचा कोन मोठा. इलेक्ट्रॉन जेव्हा फोटॉन निर्माण करतात, तेव्हा ते एल्ईडीच्या अंतर्भागात संचार करत असतात. म्हणजेच त्यावेळी एलईडीमधील अर्धवाहक पदार्थ हे त्यांचे संचारमाध्यम असते. या पदार्थांमध्ये प्रकाशाचा वेग त्याच्या हवेतील वेगाच्या तुलनेने कमी म्हणजे सुमारे पावपट असतो. त्यामुळे प्रकाश अर्धवाहक पदार्थाच्या पृष्ठभागातून बाहेर हवेत न येता आतल्या आत [[परावर्तन|परावर्तित]] होतो. हे टाळण्यासाठी अर्धवाहक पदार्थावर पुरेसा वक्रीभवनांक असणार्‍या प्लास्टिकचे आवरण करण्यात येते. "अर्धवाहक पदार्थ व प्लास्टिक" आणि "प्लास्टिक व हवा" यांच्या वक्रीभवनांकांमधील फरक हा "अर्धवाहक पदार्थ व हवा" यांच्या वक्रीभवनांकांच्या फरकाच्या तुलनेत कमी असल्याने प्रकाश प्रथम अर्धवाहक पदार्थातून प्लास्टिक व त्यातून हवेत मिसळतो.
 
[[File:E27 with 38 LCD.JPG|thumb|३८ एल्ईडी एकत्र करून बनवलेला दिवा हा सर्वसाधारण घरातल्या विद्युत प्रवाहावर चालतो.]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एलईडी" पासून हुडकले