"यकृत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: om:Tirru
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: zh-min-nan:Koaⁿ; cosmetic changes
ओळ ६:
[[प्रौढ]] अशा मानवाचे यकृत हे १.३ ते ३.० कि.ग्रॅ. इतक्या वजनाचे असते. हे नरम व गुलाबी करडया रंगाचे असते. हे मानवाच्या शरीरातील दुसर्‍या क्रमांकाचे अवयव व सर्वात मोठी ग्रंथी आहे. हे अवयव उदराच्या वरच्या बाजुस बरगड्यांच्या खाली स्थित असते.
यकृताला दोन भाग असतात.
# उजवा भाग (Right lobe)- हा डाव्या भागापेक्षा मोठा असतो.
# डावा भाग (left lobe)
 
==== रक्तप्रवाह : ====
ओळ १३:
 
==== कार्ये ====
[[चित्र:Anatomy of liver and gall bladder.png|250px|thumb|पचनसंस्थेतील यकृत व पित्ताशय]]
 
* शरीराच्या विविध क्रिया जसे साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे, जीवनसत्त्वे, लोह, क्षार यांचा साठा करणे अशी कामे यकृत पार पाडते.
* तसेच निकामी झालेल्या लाल रक्त पेशींवर प्रक्रिया करणे.
* आतड्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारे जंतू नष्ट करणे.
* निकामी [[हिमोग्लोबिन]]वर प्रक्रिया करून त्यापासुन बिलिरुबिन ची निर्मीती करणे.
* तसेच पित्त रस तयार करुन त्या व्दारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे.
* आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणाचं काम यकृत करत असतं. आपल्या रोजच्या दैनंदिन आहारातल्या घटकामधून यकृत कोलेस्टेरॉल बनवत असतं.
==== आजार ====
[[चित्र:Big Liver Tumor.JPG|250px|thumb|शस्त्रक्रियेदरम्याण यकृताची कर्करोगाची गाठ]]
शरीरातील अनावश्‍यक गोष्टींचा, विषद्रव्यांचा निचरा करण्याची जबाबदारीही यकृतावर असते. विषद्रव्ये, रासायनिक द्रव्ये, अनैसर्गिक पदार्थांचा यकृतावर ताण येऊ शकतो, ज्याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो.
# सिरॉसिस म्हणजेच यकृत -हास. हा यकृताचा एक गंभीर आजार असून यात यकृताचे कार्य सुरळीत पार पाडणा-या महत्त्वाच्या पेशींची हानी होते. हानी झालेल्या पेशींची जागा सामान्य पेशी घेतात आणि यकृतात होणा-या रक्तप्रवाहास अडथळा निर्माण करून त्यांचे कार्य रोखून धरतात. हळूहळू यकृताची सामान्य कामकाज करण्याची क्षमता कमी होते. यालाच यकृताचे कार्य बंद पडणे किंवा ‘लिव्हर फेल्युअर’ असे म्हणतात.
# सांसर्गिक हेपेटाइटिस- व्हायरल सांसर्गिक हेपेटाइटिसचे काही प्रकार आहेत.यात विषाणू बाधा होते.
#* व्हायरल [[हेपेटाइटिस- अ]]
#* व्हायरल [[हेपेटाइटिस- ब]]
#* व्हायरल [[हेपेटाइटिस- क]]
#* व्हायरल [[हेपेटाइटिस- इ]]
# यकृताचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे.
# अमिबामुळे होणारा यकृतातील गंड
 
==== प्रतिबंध ====
* कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह्‌ज टाकलेले खाद्य-पेय पदार्थ टाळणे, रासायनिक द्रव्यांनी युक्‍त औषधे, उत्पादने टाळणे.
* प्यायचे पाणी 20 मिनिटांसाठी उकळून घ्यावे. केवळ फिल्टर केलेले पाणी उकळवलेल्या पाण्याप्रमाणे सुरक्षित नसते. शक्‍यतो कोमट पाणी प्यावे. उघड्यावरचे, स्वच्छतेची व ताजेपणाची व प्रतीची खात्री नसलेले अन्न खाणे टाळावे.
* मद्यप्राशन करणे टाळावे.
 
[[वर्ग:पचनसंस्था]]
ओळ १४८:
[[yi:לעבער]]
[[zh:肝臟]]
[[zh-min-nan:Koaⁿ-chōng]]
[[zh-yue:肝]]
"https://mr.wikipedia.org/wiki/यकृत" पासून हुडकले