"वरदा गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हिंदुस्थानी अभिजात संगीत गायिका. यांचे संगीताचे शिक्षण - १) किराण...
(काही फरक नाही)

१२:५९, २३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

हिंदुस्थानी अभिजात संगीत गायिका.

यांचे संगीताचे शिक्षण -

१) किराणा घराण्याचे पं अच्युतराव अभ्यंकर २) ठुमरीचे शिक्षण सुशिलाताई पोहनकर व पं अजय पोहनकर ३) पं यशवंतबुवा महाले ४) पं मधुबुवा जोशी

यांच्याकडे झाले.

मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून कलाशाखेच्या पदवी परिक्षेत संस्कृत विषयात सुवर्णपदक व विद्यापिठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळाला आहे. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापिठात संगीत विषयात पदव्युत्तर (एम ए) परिक्षेत संगीत विषय घेऊन सर्वप्रथम.

अनेक बक्षिसे, शिष्यवृत्त्या यांना मिळाल्या असून त्यात पं भीमसेन जोशी शिष्यवृत्तीचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याचसोबत केन्द्र सरकारच्या दोन शिष्यवृत्त्यांचाही सहभाग आहे. आचार्य रातंजनकर यांच्या नावाची दोन वर्षांची मानाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

भारतात अनेक ठिकाणी गाण्याच्या मैफली झाल्या आहेत.

नितिन देसाई कृत बालगंधर्व या मराठी चित्रपटात पार्श्वगायन केले आहे.