"हरिश्चंद्र (गणिती)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
डॉ. '''हरिश्चंद्र''' (११ ऑक्टोबर, इ.स. १९२३ - इ.स. १९८३) हे भारतीय गणितज्ञ होते.
 
हरिश्चंद्रांचा जन्म ११ ऑक्टोबर, इ.स. १९२३ रोजी [[कानपूर]] येथे झाला. इ.स. १९४३ मध्ये [[अलाहाबाद विश्वविद्यालय|अलाहाबाद विश्वविद्यालयातून]] एम.एस्‌सी. झाल्यानंतर त्यांनी इ.स. १९४७ मध्ये [[केंब्रिज विद्यापीठ|केंब्रिज विद्यापीठातून]] पीएच.डी. ही पदवी मिळवली.
 
केंब्रिज येथे डॉ. हरिश्चंद्राना पॉल डिरॅक, वेइल आणि शेव्हले हे गणितज्ञ भेटले. त्यांच्याबरोबर त्याना गणितातल्या लाय ग्रुप्सवर संशोधन केले. इ.स. १९५० ते इ.स. १९६३ या काळात ते [[अमेरिका|अमेरिकेच्या]] कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक होते. इ.स. १९५४ मधे त्यांना अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचे कोल पारितोषिक मिळाले. इ.स. १९६२ मध्ये ते अमेरिकेतल्या न्यू जर्सी विद्यापीठात आमंत्रित [[प्राध्यापक]] होते. इ.स. १९६८ ते इ.स. १९८३ या काळात डॉ. हरिश्चंद्र अमेरिकेत प्रिन्सटन विद्यापीठात न्यूमन प्रोफेसर या अध्यासनावर होते. याच काळादरम्यान ते अमेरिकेच्या नॅशनल अ‍ॅकॅडमीचे आणि इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे सदस्य झाले.
 
हरिश्चंद्रांना [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] आवड होती. डॉ.डिरॅक यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स या पुस्तकावर भाळून त्यांनी भौतिकशास्त्राकडे जावे असे ठरवले होते. पण पुढे डॉ.डिरॅक भेटल्यावर त्यांच्या सूचनेनुसार ते गणिताकडे वळले.
== पुरस्कार ==
 
भारतात आल्यावर इ.स. १९७४ मध्ये डॉ. हरिश्चंद्र यांचा [[इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीनेअ‍ॅकॅडमी]]ने श्रीनिवास [[रामानुजम पुरस्कार]] देऊन गौरव केला.
 
हरिश्चंद्रांचे इ.स. १९८३ मध्ये निधन झाले.
== प्रकाशन ==
 
हरिश्चंद्र यांचे शोधनिबंध ट्रॅन्झॅक्शन्स ऑफ अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे सर्व शोधनिबंध स्प्रिंगर व्हेरलॅग या गणिताची पुस्तके प्रसिद्ध करणार्‍या प्रकाशन संस्थेने कलेक्टेड वर्क्स ऑफ डॉ.हरिश्चंद्र या नावाने ४ भागात प्रसिद्ध केले आहेत. फारच थोड्या भारतीयांना हा मान मिळाला आहे.
== संशोधन ==
 
हरिश्चंद्र यांचे संशोधन खालील विषयांत आहे.
* संवादी विश्लेषण (इंग्लिश: ''Harmonic Analysis'' ;)