"राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kn:ರಾಷ್ಟ್ರೀಯ ರಕ್ಷಣಾ ಅಕಾಡೆಮಿ (ಭಾರತ)
No edit summary
ओळ १:
'''राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी''' ही महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांमधून [[भारतीय सैन्य|भारतीय संरक्षणदलांतील]] अधिकारी घडवण्याकरिता निर्मिलेली [[पुणे|पुण्यातील]] सैनिकी प्रशिक्षणसंस्था आहे. कमिशन-पूर्व प्रशिक्षणासाठी संबंधित अकादम्यांमध्ये पाठवण्याअगोदर भूदल, वायुदल व नौदल या तिन्ही दलांसाठी या प्रबोधिनीत संयुक्त प्रशिक्षण दिले जाते. [[इ.स. १९५४|१९५४]] साली प्रबोधिनीची स्थापना झाली.
 
== प्रवेश पात्रतेच्या अटी ==
येथे प्रवेश देण्यासाठी [[केंद्रीय लोकसेवा आयोग|केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे]] (यू.पी.एस.सी.) वर्षांतून दोन वेळा परीक्षा घेण्यात येते. परीक्षेची जाहिरात दीड ते दोन महिने अगोदर फक्त एकदाच एम्लॉयमेंट न्यूज वर्तमानपत्रामध्ये येते. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, ‘सचिव, यू. पी. एस. सी., धोलपूर हाऊस, शाहजहान रोड, न्यू दिल्ली,’ या पत्त्यावर वेळेवर पाठविणे आवश्यक असते.
=== वयोमर्यादा ===
यासाठी १६ वर्षे ते १९ वर्षे अशी वयोमर्यादा असते. बारावीला [[भौतिकशास्त्र]] व [[गणित]] हे विषय असणे आवश्यक असते.
=== शैक्षणिक पात्रता ===
प्रवेशासाठी - कोणत्याही शाखेची (आर्टस्, सायन्स, कॉमर्स, व्होकेशनल) इ. १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
=== शारीरिक पात्रता ===
उंची कमीतकमी १५७.५ सें.मी. व वजन उंचीच्या प्रमाणात
=== लेखी परीक्षा ===
परीक्षा एकूण ९०० गुणांची असते. यामध्ये ३०० गुण गणित व ६०० गुण सामान्य क्षमता चाचणी असे दोन प्रत्येकी अडीच तासांचे पेपर्स असतात.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/daily/20090429/shik.htm राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे - प्रवेश विषयक संपूर्ण माहिती]
* [http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=EpvAGBzvhwMQTjkHYHtPfvoC8WkFcvi3R/YCQoGr2MhSRwYb0|m39w== सैनिकी शाळा]
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=176768:v&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116 अधिकारपदाचे राजमार्ग]
* [http://www.prahaar.in/career/17956.html सराव स्पर्धा परीक्षांचा]
* [http://72.78.249.107/esakal/20110719/4977692458587448412.htm आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न साकार होणार]
* [http://winentrance.net/category/articles/article2/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-article2/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7/ पूर्व तयारी]
[[वर्ग:पुणे]]
[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]