"सोनू निगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 59.95.1.135 (चर्चा) यांनी केलेले बदल Sankalpdravid यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा�
ओळ ३०:
=== कारकिर्द ===
सोनू निगम साधारण वयाच्या तिसर्‍या वर्षापासुन आपल्या वडिलांसमवेत सभारंभात तसेच लग्न सोहळ्यात गायचा. बालपणात त्याने बर्‍याच गायन स्पर्धांतही यशस्वी भाग घेतला. वयाच्या साधारण १९ व्या वर्षी तो आपल्या वडिलांसमवेत मुंबईत आला. <br /> त्याचे मुंबईतले सुरवातीचे वास्तव्य धडपडीचे होते. टी- सिरीज कंपनीचे मालक यांनी त्याला संधी दिली. पण त्यातही त्याला मोहम्मद रफीचीच गाणी गाण्यासाठी मिळाली. त्यामुळे बर्‍याच लोकांपर्यंत आपला आवाज पोहचवूनही त्याच्यावर, बर्‍याच जणांनी तो रफी ची नक्कल करीत असल्याचा शिक्का मारला. १९९० मध्ये त्याने जानम चित्रपटासाठी पहिले गाणे गायले पण काही कारणास्तव तो चित्रपट बंद पडला. दरम्यान, त्याने आकाशवाणीवरच्या जाहिरातींना आवाज दिला. अर्थात झी वाहिनीच्या सा रे गा मा कार्यक्रमाने त्याला ओळख दिली मग त्याने मागे वळुन पाहिले नाही. मग बेवफा सनम चित्रपटातले त्याचे 'अच्छा सिला दिया तुने' हे गाणे तुफान गाजले आणि पार्शवगायक म्हणुन स्थिरावण्याची संधी त्याला मिळाली.
सोनू ने सारेगामात सुत्रधाराची भुमिका घेतल्यापासुन त्याच्या संधी वाढल्या. १९९७ च्या बॉर्डर चित्रपटातले "संदेसे आते है" गाणे सुपरहिट झाले त्यानंतर त्याच वर्षी प्रदेस चित्रपटातले ये दिल दिवाना हे गाणे त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यात आणि रफी च्या नकलेचा शिक्का पुसण्याच्या कामी आले. त्यानंतर त्याची स्वतंत्र शैली सर्वांनी मान्य केली. तसेच रोल मॉडेल म्हणुनही तो गणला जाऊ लागला. <br /> गाण्यात भावना व्यक्त करणे, आवाजांचा पोत बदलणे यामुळे त्याला महान गायकांच्या श्रेणीत बसायला फार वेळ लागला नाही. हिंदी सोबतच त्याने बंगाली, ओरिया, कन्नड, पंजाबी, तामिळ, तेलुगू, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दु, नेपाळी, मराठी या भाषांतही गायन केलं.to X FACTOR INDIA cha parikshak hota.
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनू_निगम" पासून हुडकले